जालना, 05 मार्च : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा (Marathwada) हा भाग शेतकऱ्यांसाठी सुसाईड झोन (Suicide Zone) बनत चालला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सततचा दुष्काळाला (Draught) कंटाळून या भागातील असंख्य शेतकऱ्यांनी मृत्यूला (Farmer Death) कवढाळलं आहे. एकीकडे निसर्ग सातत्याने रुसत असताना, या भागात सावकारीचं (private moneylender) पेवं फुटलं आहे. तसेच कर्जाऊ बँकांची दंडेलशाही (Bank Torture for debt) वाढली आहे. अशातच जालन्यातील एका शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराला आणि बँकेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या (Farmer Suicide) केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील बदनापूरजवळील हलदोला येथील एका शेतकऱ्यांने बँकेच्या आणि खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या 52 वर्षीय शेतकऱ्याचं नाव देविदास विठ्ठराव मात्रे असून त्यांनी आज पहाटे 4 च्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आपला जीव दिला आहे. यावेळी त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यांनी खाजगी सावकाराचं आणि बँकेच्या कर्जामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. मृत शेतकरी देविदास विठ्ठराव मात्रे यांच्याकडे हलदोला याठिकाणी 7 एकर जमीन आहे. गेल्या काही दिवसांपासून सततच्या दुष्काळामुळे आणि नापिकीमुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. दरम्यान त्यांनी खाजगी सावकार आणि बॅंकेकडून काही कर्ज घेतलं होतं. अशातच बँकेने नोटीस पाठवून घरावर जप्ती आणण्याचा इशारा दिला होता. तर दुसरीकडे खाजगी सावकाराच्या कर्जाची पुर्तता केल्यानंतर सावकाराने धनादेश परत देण्यास नकार दिला. शिवाय मात्रे यांना धमक्या दिल्या. **हे ही वाचा -** VIDEO रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ;शौचालयातील नळाच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर त्यामुळे एकीकडे बँक आणि सावकाराच्या कात्रीत सापडलेल्या मात्रे यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी आज पहाटे चारच्या सुमारास विषारी औषध पिवून आपला जीव दिला आहे. या दरम्यान त्यांना उपचारासाठी जालना याठिकाणी नेण्यात आलं. पण उपचारापूर्वीच रस्त्यात त्यांची प्राणज्योत मालवली आहे. देविदास मात्रे यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं 9 लाख रुपयांचं कर्ज होतं. बँक अधिकाऱ्यांच्या दंडेलशाहीमुळे मात्रे यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.