जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / हॉटेलमध्ये थांबलेल्या विवाहित प्रेमीयुगुलाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

हॉटेलमध्ये थांबलेल्या विवाहित प्रेमीयुगुलाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

फाईल फोटो

फाईल फोटो

विवाहबाह्य संबंधातून धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • -MIN READ Haryana
  • Last Updated :

बहादुरगढ, 26 नोव्हेंबर : देशात अनैतिक संबंधातून हत्या आणि आत्महत्येचा घटना सातत्याने समोर येत आहेत. एका विवाहित प्रेमी युगुलाने हॉटेलमध्ये जाऊन टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेनंतर खळबळ उडाली आहेत. तसेच घटनास्थळावरुन पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून त्यात आत्महत्येच्या कारणाबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही घटना हरयाणा राज्यातील बहादुरगढ येथे घडली. याठिकाणी एका विवाहित प्रेमीयुगुलाने आत्महत्या केली. पोलिसांनी या घटनेनंतर मृतदेहांना ताब्यात घेतले आहे. तसेच पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. बहादूरगडमधील दिल्ली रोहतक रोडवर असलेल्या अल्काजा हॉटेलची आहे. जितेंद्र, (रहिवासी - सराई औरंगाबाद, बहादूरगड) आणि त्याची विवाहित प्रेयसी पूनम, (रहिवासी - नया बन्स) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी रात्री उशिरा दोघेही अल्काजा हॉटेलमध्ये पोहोचले होते. दोघेही हॉटेलच्या 307 क्रमांकाच्या खोलीत थांबले होते, तिथेच दोघांनी रात्री विष घेतले. घटनेची माहिती मिळताच, बहादूरगड सेक्टर 6 पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करून घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले. पोलिसांना खोलीत ठेवलेली एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये दोघांनी स्वतःच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे सांगितले आहे. आम्ही दोघांनी पळून जाण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, मुलांकडे पाहून मृत्यूच्या दिशेने पाऊल टाकले, यासाठी कोणालाही दोष देऊ नये. आपण स्वतः याला जबाबदार आहोत, असे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. हेही वाचा -  मामी आणि भाच्याचं जुळलं सूत, दुसऱ्या लग्नासाठी महिलेने केला पतीचाच गेम दोन्ही विवाहित असून दोघांनाही मुले - सेक्टर 6 पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील कुमार यांनी सांगितले की, रुम घेताना हॉटेलमध्ये दिलेल्या आधारकार्डवरून दोघांची ओळख पटली आहे. दोघांचे लग्न झाले होते. दोघांनाही मुले आहेत आणि दोघांचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. ही महिला बहादूरगढच्या 1 गावातील मुलगी असून तिचे रोहतक जिल्ह्यातील नयाबास गावात लग्न झाले आहे. दोघांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. नातेवाईक आल्यानंतरच पुढील कारवाई राबविण्यात येणार आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात