मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

हत्तीचा महिलेवर जीवघेणा हल्ला, उपटून काढला हात; गामस्थांमध्ये दहशत

हत्तीचा महिलेवर जीवघेणा हल्ला, उपटून काढला हात; गामस्थांमध्ये दहशत

रात्रीच्या वेळी शौचासाठी बाहेर गेलेल्या (Elephant attacks woman and pulls out her hand) महिलेवर हत्तीने हल्ला करून तिचा एक हातच उपसून काढल्याची घटना समोर आली आहे.

    रांची, 17 ऑक्टोबर : रात्रीच्या वेळी शौचासाठी बाहेर गेलेल्या (Elephant attacks woman and pulls out her hand) महिलेवर हत्तीने हल्ला करून तिचा एक हातच उपसून काढल्याची घटना समोर आली आहे. झारखंडच्या धनबादमध्ये सध्या हत्तीची दहशत पसरली असून आतापर्यंत हत्तीकडून (Many incidences of elephant attack) हल्ला होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. रात्रीच्या वेळी बाहेर पडलेल्या महिलेवर हत्तीनं हल्ला केल्यानंतर (Woman admitted to hospital)   महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. महिलेचे प्राण वाचले असून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. वाढतेय हत्तींची दहशत झारखंडच्या मनियाडीह जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून हत्तींची दहशत वाढत चालली आहे. काही महिन्यांपूर्वी एका वृद्ध महिलेवर हत्तीनं हल्ला केला होता. त्या घटनेत महिलेला आपले प्राण गमवावे लागले होते. या भागातील शेतांमध्ये हत्तींच्या झुंडी घुसत असल्याच्या घटना तर अनेकदा घडत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान तर होत आहेच, शिवाय त्यांच्या जीवालादेखील धोका निर्माण होत आहे. हे वाचा- दारूच्या नशेत केलं लग्न, शुद्धीत आल्यावर पत्नीनं मागितला घटस्फोट; पती म्हणाला... गावकरी लावतात मशाल जेव्हा जेव्हा परिसरात हत्ती घुसल्याची बातमी मिळते, तेव्हा तेव्हा गावकरी घराबाहेर मशाली पेटवून ठेवतात. मशालींना घाबरून हत्ती दूर राहतात आणि घरावर हल्ला करत नाहीत, असा गावकऱ्यांचा अनुभव आहे. गावाच्या परिसरातही वेगवेगळ्या ठिकाणी मशाली पेटवून ठेवल्या जातात. मात्र घटनेच्या वेळी हत्ती गावात शिरल्याची कुठलीही सूचना गावकऱ्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे रात्रीच्या वेळी शौचास बाहेर पडलेल्या आपल्या आईवर हत्तीने हल्ला केल्याची कल्पनाच काही तास आली नाही, अशी प्रतिक्रिया महिलेच्या मुलानं दिली आहे. बराच वेळ महिला न परतल्यामुळे गावकऱ्यांनी शोध घेतला असता ही महिला जखमी अवस्थेत विव्हळत पडलेली आढळली. त्यानंतर तातडीने तिला एसएनएमएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नागरिक स्वतःच्या जीवाची काळजी घेत असले तरी वनविभागानं हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Elephant, Jharkhand

    पुढील बातम्या