रांची, 8 जुलै : झारखंड टेंडर घोटाळ्यात (Jharkhand tender scam) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा यांच्या घरावर आज सकाळपासून ईडीकडून छापेमारी सुरू आहे. आज पहाटे 5 वाजल्यापासून ईडीने रेड मारण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 18 जागांवर रेड मारण्यात आली आहे. या रेडमुळे पंकज मिश्र यांच्या निकटवर्तीयही अडचणीत सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यादरम्यान ईडीने हिरा भगत यांच्या घरातून तब्बल 2 कोटींची कॅश जप्त केली आहे. हे पैसे मोजले जात आहेत. हे पैसे अवैध मायनिंग घोटाळ्याशी संबंधित असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीची टीम सकाळी 5 वाजल्यापासून पंकज मिश्रा यांच्या विविध ठिकाणी छापेमारी करीत आहे. पंकज मिश्रा यांच्या व्यतिरिक्त त्यांचे निकटवर्तीय मिर्या चौकी स्थित व्यावसायिक राजू, पतरु सिंह आणि ट्विंकल भगत यांच्याही घरावर ईडीने छापेमारी केली आहे. याशिवाय बरहरवामध्येही कृष्णा साहसह तीन व्यावसायिकांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. झारखंड टेंडर घोटाळा प्रकरणात राज्यातील साहेबगंज, बरहेट आणि राजमहलसह 18 ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी केली जात आहे. या छापेमारीत अर्धसैनिक दलाची मदत घेतली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीदरम्यान ईडीच्या टीमला अनेक महत्त्वपूर्ण कायदपत्र आणि पुरावे सापडले आहेत. याशिवाय ईडीच्या टीमने अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केले आहेत. सध्या सर्व ठिकाणांवर सर्च अभियान सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.