Home /News /crime /

फोर व्हिलरमध्ये लाखो रुपये, पोलिसांना सुगावा, बुलडाण्यात सिनेस्टाईल घडामोडी; अखेर चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

फोर व्हिलरमध्ये लाखो रुपये, पोलिसांना सुगावा, बुलडाण्यात सिनेस्टाईल घडामोडी; अखेर चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

तर ही रोकड कशासाठी घेऊन जाणार होते, याची चौकशी आता खामगाव पोलीस करीत आहेत.

  राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलढाणा : राज्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटना पाहायला मिळत आहे. अशातच बुलडाणा जिल्ह्यातून मोठी बातमी (Big news from Buldana) समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात तब्बल 65 लाखांची रोकड एका कारमधून जप्त करण्यात आली आहे. (65 Lakhs Rupees Cash Seized) पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने ही कारवाई केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात सिने स्टाईल (Cinestyle) पाठलाग करून 65 लाख रुपये घेऊन जाणाऱ्या चार चाकी वाहनाला पकडण्यात आले आहे. ही कारवाई खामगाव एसपी पथकाने केली. या वाहनातून तब्बल 65 लाख रुपयांची रोकड या जप्त करण्यात आली आहे. शिवाय गाडीसुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. या कारचा क्रमांक एमएच 05 सीए 4721 हा आहे. हेही वाचा - Nashik Crime : नाशिक जिल्ह्यात मुस्लिम धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या
  तर ही रोकड कशासाठी घेऊन जाणार होते, याची चौकशी आता खामगाव पोलीस करीत आहेत. चौकशी अंति संपूर्ण प्रकार समोर येईल, असे सांगत पोलिसांनी यावर माहिती देण्यास टाळाटाळ केली.
  नांदेडमध्ये काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाची दादागिरी, खंडणी प्रकरणी जेलमध्ये नांदेडमधून एक धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे. लोकप्रतिनिधींना आपण देव मानतो. त्यांना आपण जनतेचं सेवक मानतो. वेळप्रसंगी जनतेसाठी धावून जाणारे कैवारी मानतो. त्यांच्या कामांमुळे नागरीक त्यांना देवाची उपमा देतात. त्यांच्याकडे आशेने बघतात. पण त्यांच्याकडून किंवा त्यांच्याशी संबंधित कुणाकडून सर्वसामान्यांची फसवणूक, गळचेपी किंवा लुटमार झाली तर सर्वसामान्यांनी कुणाकडे जायचं? असा प्रश्न निर्माण होतो. अर्थात जनतेकडे पोलिसांचा पर्याय आहे. पण ही वेळ येऊच कशी शकते? अशा प्रश्नाने सर्वसामान्य कासावीस होतात. नांदेडमध्ये असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाने खंडणी मागितल्याप्रकरणी त्याला जेलमध्ये जावं लागलं आहे. त्याने खंडणी मागितल्यामुळे पीडितांनी त्याच्याविरोधात पोलिसात धाव घेतली होती. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर एक शिवसेनेचा माजी नगरसेवक हा फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस त्याचादेखील शोध घेत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime news

  पुढील बातम्या