बंगळुरू, 28 एप्रिल : एकिकडे देशातील कोरोना रुग्णांची (Coronavirus in india) संख्या झपाट्याने वाढते आहेत. त्यात आता खळबळजनक अशी बातमी समोर आली आहे. एकाच शहरातील तब्बल 3000 कोरोना रुग्ण बेपत्ता (Corona patient missing) झाले आहेत आणि त्यांचे फोनही बंद आहेत. ही घटना आहे, कर्नाटकाच्या (Karnataka coronavirus cases) बंगळुरू (Bengaluru coronavrius cases) शहरातील.
कर्नाटकचे महसूलमंत्री ए अशोक यांनी कोरोना रुग्ण बेपत्ता झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. अशोक म्हणाले, "आम्ही लोकांना मोफत औषधं देत आहोत, ज्यामुळे कोरोनाची प्रकरणं नियंत्रणात येतील. पण या लोकांनी आपले मोबाइल फोन बंद केले आहेत. त्यांनी आपल्याबाबत कुणाला माहितीही दिली नाही आहे. असे बहुतेक रुग्ण गंभीर स्थितीत रुग्णालयात पोहोचतात आणि आयसीयू बेड शोधतात. सध्या असंच होत आहे."
"माझ्या मते, बंगळुरूतील कमीत कमी दोन ते तीन हजार लोकांनी आपले फोन बंद केले आहेत आणि आपलं घर सोडून कुठेतरी दुसरीकडे गेले आहेत. आम्हाला माहिती नाही ते कुठे गेले आहेत. परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे", असं त्यांनी सांगितलं.
हे वाचा - सत्ताधारी भाजप आमदारालाच 24 तास मिळाला नाही ICU बेड; कोरोनाने झाला मृत्यू
कर्नाटकात कोरोना भयावह रूप घेत आहे.मंगळवारी 30 हजार पेक्षा जास्त कोरोना संक्रमित आढळले आहेत. बंगळुरू शहरातच 17000 पेक्षा जास्त कोरोना रिगण सापडले. राज्यात तीन लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील दोन लाख एकट्या बंगळुरूत आहेत. एकूण कोरोना रुग्णांची संख्या 14 लाख पार गेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bengaluru, Corona patient, Coronavirus, Karnataka