भोपाळ, 9 मार्च : महिलांसोबत मारहाण ( husbands torture) आणि घरगुती हिंसाचाराच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दुर्देवी म्हणजे नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या महिला पोलिसांलाही या सर्वाचा सामना करावा लागत आहे. मध्य प्रदेशातून भोपाळमधून असंच एक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका इंजिनिअर पतीने आपली DCP पत्नी नेहा पच्चीसिया (dsp neha pachisia) हिच्यासोबत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने पत्नीला आधी धक्का दिला, यानंतर तिचं डोक्यावर भिंतीवर आपटलं. यामुळे महिलेच्या डोक्याला जखम झालेली आहे. महिला अधिकाऱ्याने पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पतीने का केली मारहाण? पतीने मारहाण केलेली ही महिला अधिकारी DSP नेहा पच्चीसिया आहे. त्या अनेक दिवसांपासून भोपाळच्या पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. ती आपल्या इंजिनिअर पतीपासून वेगळी मुलांसह चार इमली भागात राहते. तर तिचा पती कुणाल जोशी दुसरीकडे राहतो. महिलेने आरोप केला आहे की, पतीला नशेच व्यसन आहे. महिलेने आपल्या तक्रारीत लिहिलं की, रविवारी सायंकाळी पती कुणाल जोशी घरी येण्यासाठी जबरदस्ती करीत होता. जेव्हा महिलेने त्याला घरात येण्यापासून रोखलं तर तो गैरवर्तणूक करू लागला. यात दोघांमध्ये वाद सुरू झाला. पती महिलेला मारहाण करू लागला. कुणालने महिलेचे डोकं भिंतीवर आपटलं. हे ही वाचा- महिला दिनी पत्नीची हत्या; तब्बल 2 तास मृतदेहाच्या शेजारी बसला आणि मग… यादरम्यान नेहा जखमी झाल्या. या मारहाणीत त्या जखमी झाल्या आहेत. मारहाणीच्या वेळी पती दारूच्या नशेत असल्याचं सांगितलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर पतीने महिला अधिकाऱ्याच्या सर्व आरोपांना फेटाळलं आहे. त्याने सांगितलं की, पत्नी खोटं बोलते. मी मुलांना भेटायला आलो होतो. मी पत्नीला मारहाण केली नसल्याचं त्याने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.