मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बायकोसोबत वादानंतर पतीने चिमुकल्याला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, नंतर स्वत:ही मारली उडी

बायकोसोबत वादानंतर पतीने चिमुकल्याला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, नंतर स्वत:ही मारली उडी

मद्यधुंद अवस्थेत पती त्याच्या पत्नीला घ्यायला सासरी गेला; पण तिथे दोघांत वाद झाला आणि राग अनावर झाल्याने पतीने त्याच्या दोन वर्षीय मुलाला उचलून तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिलं.

मद्यधुंद अवस्थेत पती त्याच्या पत्नीला घ्यायला सासरी गेला; पण तिथे दोघांत वाद झाला आणि राग अनावर झाल्याने पतीने त्याच्या दोन वर्षीय मुलाला उचलून तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिलं.

मद्यधुंद अवस्थेत पती त्याच्या पत्नीला घ्यायला सासरी गेला; पण तिथे दोघांत वाद झाला आणि राग अनावर झाल्याने पतीने त्याच्या दोन वर्षीय मुलाला उचलून तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिलं.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली, 17 डिसेंबर : पती-पत्नीमधला वाद विकोपाला गेल्याच्या अनेक घटना दररोज घडत असतात. अशी अनेक प्रकरणं पोलिस ठाण्यापर्यंतही पोहोचतात. परंतु, दिल्लीतल्या कालकाजी भागात एक विचित्र घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत पती त्याच्या पत्नीला घ्यायला सासरी गेला; पण तिथे दोघांत वाद झाला आणि राग अनावर झाल्याने पतीने त्याच्या दोन वर्षीय मुलाला उचलून तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिलं. नंतर स्वत:ही उडी घेतली. गंभीर जखमी बाप-लेकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ‘टीव्ही नाइन हिंदी’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (16 डिसेंबर) रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. थोड्याच वेळात पोलिसांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली. एका व्यक्तीने पत्नीशी वाद घालून दोन वर्षांच्या एकुलत्या एक मुलाला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकल्याचं पोलिसांना कळविण्यात आलं होतं. पोलिस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा गंभीर जखमी असलेल्या बाप-लेकाला स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांची प्रकृती नाजूक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना ट्रॉमा केअरमध्ये पाठवण्यात आलं आहे. ही घटना सर्वोदय कॅम्प कालकाजी या भागात घडली.

  हेही वाचा : वयाच्या नवव्या वर्षी 17 फूट खोल तळघरात डांबलं; माती खाऊन जगली 17 दिवस; पुस्तक लिहून सांगितली अपहरणाची कहाणी

   अनेक दिवसांपासून पती-पत्नीत सुरू होता वाद

  दिल्लीतल्या कालकाजी भागात सर्वोदय कॅम्पमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय कॉलनी ओखला इथला रहिवासी आहे. त्याचं नाव मानसिंह असं आहे. अनेक दिवसांपासून पत्नीशी त्याचं भांडण सुरू होतं. शुक्रवारी तो पत्नीला भेटण्यासाठी तिच्या माहेरी गेला होता. त्याला मद्यधुंद अवस्थेत पाहताचा पत्नीचा पारा चढला. त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं आणि मानसिंहने स्वतःच्या मुलाला उचलून तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं. गोंधळ वाढल्यानंतर त्याने स्वतःही तिथून इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली.

  हेही वाचा : अंधश्रद्धा बेतली जिवावर मी तुला पुन्हा जिवंत भेटेन म्हणत तरुणाने केली आत्महत्या

   सोबत येण्यास नकार दिल्यानं वाद विकोपाला

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसिंहला दारूचं व्यसन आहे. शुक्रवारीही तो मद्यधुंद अवस्थेत होता. पत्नीशी बोलण्यासाठी सासरी गेला होता. पत्नीला सोबत नेण्याचा त्याचा विचार होता; पण मद्यधुंद पाहून पत्नीने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. त्यावरून दोघांत कडाक्याचं भांडण झालं आणि मानसिंहने मुलाला आधी खाली फेकलं आणि नंतर त्याने उडी घेतली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. सध्या पोलिसांनी मानसिंहला ताब्यात घेतले असून, देखरेखीखाली त्याच्यावर उपचार केले जात आहेत.

  First published:
  top videos

   Tags: Crime, Delhi