मुंबई, 4 ऑगस्ट : मुंबई पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील नालासोपारामधील औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीवर छापेमारी केली. छापेमारीदरम्यान 1400 कोटी रुपयांची 700 किलोग्रॅमहून जास्त मेफेड्रोन जप्त करण्यात आला. पोलिसांनी छापेमारी दरम्यान 5 लोकांनांही अटक करण्यात आलं आहे. छापेमारीत मुंबई क्राइम ब्रान्चच्या अँन्टी नारकोटिक्स सेलने छापेमारी केली. सेलने दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत मेफेड्रोन नावाच्या प्रतिबंधित औषधांची निर्मिती केली जात आहे. ANC अधिकाऱ्यांनी सांगितलं की, चार आरोपींना मुंबईत अटक करण्यात आली आहे. तर एका व्यक्तीला पालघरच्या नालासोपारामध्ये अटक करण्यात आली आहे. क्राइम ब्रान्चने दावा केला आहे की, गेल्या काही दिवसांपासून नशेच्या औषधांच्या विरोधात केलेल्या कारवाईत ही सर्वात मोठी कारवाई आहे. मेफेड्रोनला म्याऊ म्याऊ किंवा एमडी म्हणून ओळखली जाते. हे एक सिंथेटिक ड्रग आहे. हा नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सब्सटेन्स अधिनियमच्या अंतर्गत प्रतिबंधित पदार्थ आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकारची कारवाई डीआरआयच्या टीमने गुजरातमध्ये मुंद्रा बंदरावर 20 सप्टेंबर 2021 लाही केली होती. येथून 9000 कोटी रुपयांचे ड्रग्स ताब्यात घेण्यात आले. एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी तेथून 2,988.22 किलोग्रॅम हेरोइन जप्त केली होती. ड्रग्सची ही खेपेचं कनेक्शन आंध्रप्रदेशच्या विजयवाडा येथून होतं. पकडण्यात आलेली नशेची खेप विजयवाडाच्या आशी ट्रेडिंग कंपनीच्या आयात केलेल्या पॅकेजच्या आता लपवण्यात आली होती. ही कंपनी अफगणिस्तानहून टॅल्क दगड आयात करण्याचा दावा केला जात आहे आणि त्यांना इराणच्या अब्बास पोर्टातून गुजरातची मुंद्रा पोर्ट पाठवली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







