मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /ड्रग्ज नेटवर्कमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसह मोठ्या व्यक्तींचा समावेश; तस्कराच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड

ड्रग्ज नेटवर्कमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसह मोठ्या व्यक्तींचा समावेश; तस्कराच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेली हेरॉइनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोटींहून अधिक आहे.

फिरोजाबाद, 7 फेब्रुवारी : एक कुख्यात तस्कराला अटक करण्यात फिरोजाबाद पोलिसांना यश आलं आहे. त्या गुन्हेगाराजवळ 500 ग्रॅमहून अधिक प्रमाणात हेरोइन जप्त करण्यात आलं आहे. त्याशिवाय तस्कर करीत असलेला गांजाही सापडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अनेक नावं मिळाली असून ज्यांचा या गुन्हेगारीत सहभाग आहे. पकडण्यात आलेल्या तस्करांची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेली हेरॉइनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोटींहून अधिक आहे.

फिरोजाबाद पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार महबूब खा याला अटक केली आहे. याच्याजवळ 500 ग्रॅमहून अधिक हेरोइन सापडली आहे. एसएसपी अजय कुमार पांडेय यांनी सांगितलं की, कुख्यात गुन्हेगारावर 1999 पासून आतापर्यंत तब्बल 20 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या नेटवर्कमध्ये एकूण 14 लोकांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे.

हे ही वाचा-दारूच्या किंमती कमी करण्यासाठी मद्यप्रेमीचं आंदोलन; पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या

ज्यांचा शोध घेण्यासाठी पाच जणांची टीम लावण्यात आली आहे. यामध्ये काही व्हाइट कॉलक, काही पोलीस कर्मचारी आणि काही स्थानिक मीडिया कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चौकशीदरम्यान ही बाब समोर आली. एसएसपीचं म्हणणं आहे की, कोणत्याही दोषी व्यक्तीची सुटका होणार नाही. जनपदमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने कोणा तस्कराकडून हेरोइन जप्त केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Drugs