मुंबई, 30 मे : माणुसकीला काळिमा फासणाऱ्या बापाचं धक्कादायक कृत्य समोर आलं आहे. बायकोचे परपुरुषासोबत संबंध असल्याच्या संशयावरून पतीने मुलीला पेस्टिसाईडचं इंजक्शन दिलं, त्यामुळे मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. ओडिसाच्या बालासोर भागामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी मुलीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. आरोपीचं नाव चंदन महाना आहे. एका वर्षापूर्वीच त्याचं लग्न तन्मयीसोबत झालं होतं, यानंतर त्यांना आताच 9 मे रोजी मुलगी झाली होती. ही मुलगी आपली नसून पत्नीचे अनैतिक संबंध आहेत त्यातूनच बाळाचा जन्म झाला आहे, असा संशय आरोपीला होता. याच कारणामुळे आरोपीने पत्नीवर राग काढताना मुलीच्या डोक्यात पेस्टिसाईडचं इंजक्शन दिलं, असं पोलिसांनी सांगितलं आहे. मुलीच्या आईकडून आम्हाला कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यात आली नाही, पण आम्ही स्वत:हून वडील चंदन महानाविरोधात गुन्हा दाखल केला आहे, असं पोलिसांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. ‘दादा येऊ नकोस, लग्न मोडेल, 12 लाख द्यावे लागतील’, नगरच्या बहिणीचं भावाला इमोशनल पत्र मागच्या सोमवारी ही घटना घडली, त्यानंतरही आरोपीवर कारवाई होत नसल्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. अखेर पोलिसांनी स्वत:च गुन्हा दाखल केला. ही घटना तन्मयीच्या माहेरी झाली. मुलीच्या जन्मानंतर सासरच्यांनी तिला माहेरी पाठवलं होतं. यानंतर सोमवारी चंदन पत्नीला भेटण्यासाठी पोहोचला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर चंदन संतापला. तन्मयी बाथरूममधून बाहेर आली तेव्हा तिने नवऱ्याच्या हातात इंजक्शन आणि पेस्टिसाईडची बॉटल बघितली. तन्मयीने याबद्दल सुरूवातीला चंदनला विचारलं तेव्हा त्याने काहीच सांगितलं नाही, पण नंतर त्याने मुलीच्या डोक्यात इंजक्शन दिल्याचं कबूल केलं. मुलीच्या डोक्यावर जखमेच्या खुणाही दिसल्या, त्यामुळे त्याच्या या घृणास्पद कृत्याची पुष्टीही झाली. पठ्ठ्या परिक्षेला आला, कॉपीचा पॅटर्न पाहून सगळेच चक्रावले, नाशिक पोलिसांकडून अटक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.