भोपाळ, 25 जानेवारी : मध्य प्रदेशची (Madhya Pradesh News) राजधानी भोपाळमध्ये (Bhopal News) सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनेच्या वेळी तो घरात एकटाच होता. त्याची आई 16 वर्षीय मुलीसोबत तिची उत्तरपत्रिका शाळेत जमा करण्यासाठी गेली होती. आई बाजारात असताना मुलाने त्याला फोन केला आणि म्हणाला, आई काहीतरी चांगलं खायला घेऊन ये. आई घरी परतली तर काळजाचा तुकडा सीलिंग फॅनवर लटकत होता. (school student suicide)
वडिलांनी विनंती..मुलांना एकटं सोडू नका...
मुलाच्या आत्महत्येनंतर या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. यावेळी त्याच्या वडिलांनी सांगितलं की, सर्वांना हात जोडून विनंती आहे की, मुलांना एकटं सोडू नका. मुलं टीव्हीवर क्राइमच्या मालिका पाहून नवनवे प्रयोग करीत आहेत. त्यांनी सांगितलं की, मुलगा मोबाइलवर गेम खेळत नव्हता. तो फक्त ऑनलाइन क्लाससाठी मोबाइल घ्यायचा. रुद्राक्ष अभ्यासात हुशार होता. मात्र त्याने असं का केलं याबद्दल काहीच कळत नाहीये. त्याला काही त्रास नव्हता. (Dont leave children alone Fathers heartfelt request after 10 year old son suicide)
हे ही वाचा-मुलगी झाली म्हणून पत्नीची हत्या; नवजात बाळाला मृतदेहाशेजारी ठेवून कुटुंबीय फरार!
आईला फोन करून म्हणाला...
एकतापुरी कॉलनी, अशोका गार्डनमध्ये राहणारे अक्षत सिंह फोटोग्राफर आहेत. सोमवारी सकाळी ते कामावर निघून गेले. पत्नी स्नेहलता, मुलीला घेऊन शाळेत गेली. घरात मुलगा रुद्राक्ष एकटाच होता. सायंकाळी रुद्राक्षने वडिलांना फोन केला. आईबद्दल विचारलं. त्यानंतर त्याने आईला फोन केला. म्हणाला, मला काहीतरी चांगलं खायला घेऊन ये. आई शाळेनंतर बाजारात जाऊन सायंकाळी उशिरा घरी पोहोचली. घरात शिरताच तिने पाहिलं की, रुद्राक्षने गळफास घेतला होता. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhopal News, Crime news, Suicide