जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / आयुष्याला कंटाळून तरुणाने चक्क शेवींग ब्लेडचे 56 तुकडे गिळले, पुढे जे घडलं ते भयानक

आयुष्याला कंटाळून तरुणाने चक्क शेवींग ब्लेडचे 56 तुकडे गिळले, पुढे जे घडलं ते भयानक

आयुष्याला कंटाळून तरुणाने चक्क शेवींग ब्लेडचे 56 तुकडे गिळले, पुढे जे घडलं ते भयानक

तरूणाने आत्महत्येच्या विचारातून धक्कादायक पाऊल उचलल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.

  • -MIN READ Local18 Jaipur,Rajasthan
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 मार्च : राजस्थानमधील जालौर भागात एक भयानक घटना समोर आली आहे. तरूणाने आत्महत्येच्या विचारातून धक्कादायक पाऊल उचलल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. 24 वर्षीय तरुणाच्या पोटातून एक दोन नव्हे तर दाढी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लेडचे 56 तुकडे बाहेर काढण्यात आले आहेत. या तरुणाने आत्महत्या करण्यासाठी हे भयंकर कृत्य केल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

जाहिरात

हा तरुण सांचौर येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. तो नोकरीमुळे त्रस्त होता. त्यामुळेच त्याने टोकाचे पाऊल उचलले. डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करून त्याच्या पोटातून ब्लेडचे तुकडे काढले आहेत. त्यामुळे तो बचावला आहे. त्याची प्रकृतीही धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

संतापजनक! त्याला सोडू नका, फाशी द्या; चिठ्ठी लिहून कोल्हापुरात तरुणीनं संपवलं आयुष्य

रविवारी यशपालचे चारही मित्र घराबाहेर गेले होते. याच वेळेचा फायदा उचलंत यशपालने एकत्र तीन पॅकेट गिळले होते. या घटनेनंतर त्यांची तब्येत इतकी बिघडली की त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या.यानंतर त्याने मित्रांना फोन करून घरी बोलावले होते.त्यानंतर त्याला मनमोहन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथून दुसऱ्या रूग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता.

जाहिरात

रूग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी उपचार सुरु केले. ड़ॉक्टरांनी सुरूवातीला यशपालचा एक्सरे आणि सोनोग्राफी काढली.या सोनोग्राफीत त्यांच्या नजरेस धक्कादायक बाब पडली. रूग्णाच्या पोटात ब्लेडचे तुकडेच तुकडे दिसत होते. त्यानंतर यशपालवर तज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

इन्स्टाग्रामवरील प्रेमाची अजब कहाणी, पतीला झोपेची गोळी देऊन केलं भयानक कांड…

यशपालच्या शरीराच्या आतला भाग खुपच डॅमेज झाला होता. त्याची तब्येत खुपच नाजूक होती. त्यामुळे डॉक्टरांनी टीम नेऊन त्याचे प्राण वाचवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार डॉक्टरांनी 7 जणांची टीम तयार करून रूग्णावर उपचार केले.तब्बल 3 तास तरूणावर उपचार करण्यात आले. या उपचारा दरम्यान तरूणाच्या पोटातून 56 ब्लेड बाहेर काढले गेले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात