जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / इन्स्टाग्रामवरील प्रेमाची अजब कहाणी, पतीला झोपेची गोळी देऊन केलं भयानक कांड...

इन्स्टाग्रामवरील प्रेमाची अजब कहाणी, पतीला झोपेची गोळी देऊन केलं भयानक कांड...

इन्स्टाग्रामवरील प्रेमाची अजब कहाणी, पतीला झोपेची गोळी देऊन केलं भयानक कांड...

उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक महिला तिच्या दोन मुलांसह घरातून दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली.

  • -MIN READ Local18 New Delhi,Delhi
  • Last Updated :

हिमांशु जोशी (लोहाघाट) 16 मार्च : उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक महिला तिच्या दोन मुलांसह घरातून दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली होती. पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला आणि ती मध्य प्रदेशात सापडली. 27 वर्षीय महिला तिच्या इन्स्टाग्रामवर भेटलेल्या प्रियकरासह पळून गेली होती, जो तिच्यापेक्षा 7 वर्षांचा लहान आहे.

जाहिरात

दरम्यान पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेत पतीकडे पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र आता ती पतीसोबत राहण्यास नकार देत आहे. महिला आणि तिचा प्रियकर दोघेही एकत्र राहण्यावर ठाम आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

संतापजनक! त्याला सोडू नका, फाशी द्या; चिठ्ठी लिहून कोल्हापुरात तरुणीनं संपवलं आयुष्य

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोहघाट येथील रहिवासी असलेल्या महिलेची वर्षभरापूर्वी मनोज गुर्जर (20) याच्याशी इन्स्टाग्रामवर भेट झाली होती. दोघांमध्ये पुढे बोलण वाढत गेलं. काही काळातच दोघांमध्ये प्रेम झाले. महिलेला भेटण्यासाठी मनोज दोन वेळा लोहघाट येथे आला होता. 3 मार्च रोजी तो पुन्हा लोहघाट येथे आला.

दरम्यान त्यांच्यात ठरलेल्या प्लॅननुसार 5 मार्च रोजी त्याने महिलेसाठी झोपेच्या गोळ्या आणल्या होता. महिलेने पतीला झोपेच्या गोळ्या देऊन झोपवले. त्यानंतर ती आपल्या दोन्ही मुलांसह घरातून 52 तोळे सोन्याचे दागिने, 50 हजार रुपये रोख, एफडी आणि एलआयसीची कागदपत्रे घेऊन पळून गेली आहे.

महिलेच्या पतीने तक्रार देताना पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान महिलेचे लोकेशन मध्य प्रदेशात सापडले. लोहघाट पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना पकडून येथे आणले.

जाहिरात

सीओ विपिन चंद्र पंत यांनी सांगितले की, मनोजने आग्रा येथील एका दुकानात 14 तोळे सोने साडेसात लाख रुपयांना विकले. मनोजच्या काकांनी त्याला सोने विकण्यात मदत केली. महिला आणि मनोज यांच्याविरुद्ध भादंवि कलम 365, 380/411 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑर्केस्ट्रा पाहून परतणाऱ्या तरुणासोबत केले ‘भयानक कृत्य’, वाचून बसेल धक्का

दोघांना न्यायालयात हजर केले जात आहे. मनोजच्या काकांवरही गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही मुलांना आजोबांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात