मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /'तुला कुणाच्या घरात जायचं कळत नाही का?' पुण्यात मांजरीवरुन महिलांच्यात बाचाबाची, वाद पोहोचला थेट पोलीस ठाण्यातच...

'तुला कुणाच्या घरात जायचं कळत नाही का?' पुण्यात मांजरीवरुन महिलांच्यात बाचाबाची, वाद पोहोचला थेट पोलीस ठाण्यातच...

मांजरवरुन वाद

मांजरवरुन वाद

शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन महिलांमध्ये मांजरीवरून जुंपली अन् काय झालं वाचा..

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 25 फेब्रुवारी : आज काल कोणाचा वाद कशावरून होतो, याचा अंदाज नाही. पुणे शहरात तर कधी काय होईल, याचा नेमच राहिला नाही, कारण मागील अनेक दिवसांपासून याठिकाणी गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याठिकाणी कधी कोयता गँगची दहशत, तर कधी कुत्रे, मांजरवरून भांडणाचे वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहचलेले पाहायला मिळतात. असाच आणि एक प्रकार उघडकीस आला आहे.

पुण्यातल्या खडकी परिसरात राहणाऱ्या दोन शेजाऱ्यांमध्ये मांजरीवरून दोन बायकांची जुंपली आणि हे प्रकरण थेट खडकी पोलीस ठाण्यात पोहचले आहे. उषा मधुकर वाघमारे (वय 45 रा. सावंत नगर, बपोडी, खडकी पुणे) तर रेश्मा सलिम शेख (वय 45 रा. शेजारी) अशी या दोन्ही महिलांची नावे आहेत. या दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं -

मिळालेल्या माहितीनुसार, उषा आणि रेशमा या दोन्ही महिला पुण्यातल्या खडकी परिसरात एकच सोसायटीमध्ये शेजारी शेजारी राहायला आहेत. रेशमा यांच्याकडे एक भटकी मांजर आहे. या मांजरीला त्या घरात सांभाळत असतात. काल दुपारच्या वेळेत उषा वाघमारे या घरात कपडे धुवत असताना रेशमा यांची मांजर त्यांच्या घरात गेली.

हेही वाचा - पुणे : व्याजाने घेतलेले पैसे परत केले, तरीही मारहाण करुन पैशांची मागणी, कंटाळून टोकाचं पाऊल

हे पाहून रेशमाने उषाच्या घरात जाऊन तिला परत आणले. मात्र, परत आणत असताना रेशमाने मांजरला शिव्या देत कोणाच्या घरात जायचं हे कळत नाही का? असं बोलल्या हे पाहून उषा या चांगल्याच संतापल्या आणि दोघांमध्ये तू तू मैं मैं ला सुरुवात झाली. यानंतर दोन्ही एकमेकांना शिव्या देऊ लागल्या आणि नंतर हा वाद टोकाला जात उषा आणि रेशमा या दोन्ही महिलांमध्ये हाणामारी झाली. यानंतर हा वाद थेट खडकी पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी दोघांची बाजू ऐकून दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

First published:

Tags: Cat, Pune, Pune poilce, Woman