मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /किळसवाणा प्रकार! सिरिंजमध्ये स्पर्म भरून भर दुकानासमोर महिलेला टोचलं

किळसवाणा प्रकार! सिरिंजमध्ये स्पर्म भरून भर दुकानासमोर महिलेला टोचलं

या माथेफिरू व्यक्तीच्या कारमध्ये अशा अनेक सिरिंज भरून ठेवलेल्या आढळल्या.

या माथेफिरू व्यक्तीच्या कारमध्ये अशा अनेक सिरिंज भरून ठेवलेल्या आढळल्या.

या माथेफिरू व्यक्तीच्या कारमध्ये अशा अनेक सिरिंज भरून ठेवलेल्या आढळल्या.

वॉशिंग्टन, 10 सप्टेंबर : अमेरिकेत (America) एका व्यक्तीला सीमेट अटॅक (Semen Attack) साठी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. येथे एका व्यक्तीने महिलेवर आपल्या वीर्यने भरलेली सिरिंजने हल्ला केला. त्याने किराण्याच्या दुकानात शॉपिंग करण्यासाठी आलेल्या महिलेच्या शरीरात सिरिंजने भरलेली सुई टोचली. द सनच्या रिपोर्टनुसार, मेरीलँडमधील एका सुपरमार्केटमधील केटी पीटर्स नावाची महिला शॉपिंग करण्यासाठी आली होती. यादरम्यान थॉमस ब्रायन स्टेमन नावाच्या व्यक्तीने महिलेच्या शरीरात वीर्याने भरलेली सिरिंज टोचली. (Disgusting type He filled a syringe with semen and stabbed the woman in front of the shop )

या 51 वर्षीय थॉमसने अत्यंत हुशारीने सीमेन अटॅक केला. इतकच नाही तर सिरिंज लावल्यानंतर महिलेला वेदना झाल्या. यावर थॉमस म्हणाला की, मला माहीत आहे की, हे मधमशीने दंश केल्या सारख वाटतं, नाही? सुई टोचल्यानंतर ती व्यक्ती महिलेच्या शेजारी उभी राहिली. मिळालेल्या माहितीनुसार, केटी पीटर्सवर हा हल्ला फेब्रुवारी 2020 मध्ये झाला होता. ही घटना स्टोअरवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. थॉमसच्या या कृत्यावर कारवाई करीत त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. 18 महिन्यांनंतर आता थॉमसला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हे ही वाचा-नोकरी सोडून तिनं कचऱ्याचा व्यवसाय केला सुरू, आता बनलीय करोडपती

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, स्टोअरमध्ये प्रवेश केल्यानंतर थॉमसने त्याला धक्का दिला. याच्या काही वेळानंतर कमरेवर त्याला सिगारेट जळाल्यासारखं वाटतं. घरी जाऊन पाहिलं तर कमरेवर जखम झाली होती.

यानंतर महिला पुन्हा स्टोअरमध्ये आली आणि तिने सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर तिला संशय आला. यानंतर तिने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी सांगितलं की, त्याच्या कारमधून एक सिरिंज सापडले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचं कृत्य त्याने अनेकांसोबत केलं असण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Injection