Home /News /mumbai /

मास्क घालून शिरला क्लिनिकमध्ये, एकट्या बसलेल्या महिला डॉक्टरवर केला प्राणघातक हल्ला

मास्क घालून शिरला क्लिनिकमध्ये, एकट्या बसलेल्या महिला डॉक्टरवर केला प्राणघातक हल्ला

भाईंदरमध्ये (Bhayandar) एका महिला डॉक्टरवर (Female Doctor) जीवघेणा हल्ला (Attacked) करण्यात आला. यामध्ये महिला डॉक्टर गायत्री जयस्वाल यांना गंभीर दुखापत झाली आहे.

    मुंबई, 24 जानेवारी: भाईंदरमध्ये (Bhayandar) एका महिला डॉक्टरवर (Female Doctor) जीवघेणा हल्ला (Attacked) करण्यात आला. यामध्ये महिला डॉक्टर गायत्री जयस्वाल यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना भाईंदर पश्चिमेच्या एका खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा हल्ला चोरीच्या उद्देशानं करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. भाईंदर पश्चिमेस नारायणा शाळेजवळ डॉ. गायत्री जयस्वाल यांचं क्लिनिक आहे. या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून संबंधित आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू केलं आहे. दिवसाढवळ्या भाईंदर पश्चिमेच्या अमृतवाणी रोडवर असलेल्या एका खासगी क्लिनिकमध्ये अनोळखी इसम यांनी प्रवेश केला आणि महिला डॉक्टर गायत्री जयस्वाल यांच्यावर हल्ला केला. आरोपी दागदागिने मोबाईल पैसे घेऊन पसार झाला आहे. आरोपीचा शोध घेण्याचं काम भाईंदर पोलीस करत आहे. कशी घडली घटना हल्ला झाला तेव्हा डॉक्टर एकट्याच क्लिनिकमध्ये बसल्या होत्या. तेव्हा डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करुन सोन्याची चैन आणि आदी ऐवजी लुटून पसार झाला. डॉक्टर जयस्वाल नेहमीप्रमाणे आपल्या क्लिनिकमध्ये बसल्या होत्या. त्याच दरम्यान मास्क घातलेला एकजण क्लिनिकमध्ये आला. त्याच वेळी एक दाम्पत्य उपचारासाठी आली त्यावेळी मास्क घातलेली व्यक्ती पुन्हा बाहेर आली. चिंता वाढवणारी बातमी, राज्यातल्या 'या' जिल्ह्यात आढळले Omicron चे तीन म्युटेशन दाम्पत्य गेल्यावर ती व्यक्ती पुन्हा आत गेली आणि काही मिनीटांनी बाहेर येऊन बाहेर उभ्या केलेल्या बाईकवरून पळून गेली. क्लिनिकमध्ये असताना आरोपीनं रक्तदाब तपासायच्या यंत्रानं डॉक्टरच्या डोक्यावर अनेकवेळा हल्ला केला. या हल्ल्यात गायत्री यांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या. त्यांच्या डोक्याला सुमारे 35 ते 40 टाके पडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Attack, Crime news, Woman doctor

    पुढील बातम्या