मुंबई, 17 फेब्रुवारी : 24 तास जागणाऱ्या मुंबईत सध्या नाईट रेसिंग फॅडने (bike racing) मुंबई पोलिसांची (Mumbai Police) झोप उडवली आहे. मुंबईतील रस्ते मोकळे झाले की स्टंटबाजी करत नाईट रेसिंग करण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. ज्यामुळे मुंबईकरांना त्रास होतोच आहे मात्र या स्टंटबाज आणि नाईट रेसिंगने मुंबई पोलिसांच्या ही नाकात दम केला. अनेक वेळा कारवाई करुन देखील हे स्टंटबाज आणि नाईट रेसिंग सुरूच आहेत. हो लक्षात आल्यावर या मागचे कारण शोधून मुंबई पोलिसांनी आता त्यांच्या मुळावरच घाल घालायचे ठरवले आहे. याकरता मुंबई पोलिसांच्या विभागाने काही विशेष टीम बनवल्या असून या टीम गेल्या 6 महिन्यापर्यंतचे मुंबईतील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासात आहे. जेणेकरुन गेल्या 6 महिन्यात किती स्टंटबाजी आणि नाईट रेसिंग झाली. याचा तपशील तयार करून ते न्यायालयात सादर केला जाईल आणि अशा नाईट रेसिंग करणाऱ्या तरुणांना तर कठोर शिक्षेची मागणी न्यायालयाकडे केली जाईलच सोबतच त्यांनी स्टंटबाजी आणि नाईट रेसिंग करता वापरलेली बाईक कायमची जप्त करुन ती नष्ट केली जाईल, याबाबत मुंबई वाहतूक पोलिस न्यायालयाकडून परवानगी घेणार आहेत.
मुंबईतल्या रेसिंग खेळणाऱ्या विविध ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करून आतापर्यंत 300 हून अधिक वाहने जप्त केली आहेत. वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे रिक्लेमेशन पश्चिम द्रुतगती मार्ग याठिकणी आतापर्यंत पोलिसांनी अनेक कारवाया केल्या आहेत. पण आतापर्यंत कठोर कारवाया झाल्या नव्हत्या. वाहतूक पोलिसांनी आता अशा स्टंटबाजांविरोधात धडक मोहिम उघडली आहे. या शर्यतीमुळे आस पास परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अच्छे दिन! विराटशी पंगा घेणाऱ्या मुंबई इंडियंसच्या या खेळाडूला संधी मिळणार? शिवाय गाड्यांचा कर्ण कर्कश आवाज आणि तरुणांचा आरडाओराड यामुळे ज्येष्ठांना सुद्धा त्रास होतो. त्यामुळे राञीच्या वेळी मोकळ्या रस्त्यांवर गाड्या घेऊन हुल्लडबाजी वाहतूक पोलीस गाड्या जप्त करण्याची कारवाई करत आहेत. या कारवाई अंतर्गत वांद्रे वाहतूक पोलिसांनी २१० दुचाकी जप्त केल्या आहेत. अशी माहिती यशस्वी यादव, सह पोलीस आयुक्त मुंबई वाहतूक विभाग यांनी दिली. अशा कारवाईमुळे मोकळ्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळी हुल्लडबाजी बाजी करणाऱ्यांना चाप बसू शकतो. यासाठी वाहतूक विभाग विशेष प्रयत्न करत आहेत.