इंदूर, 25 जुलै: देशात महिलांसोबत धोक्याच्या घटना वाढत आहेत. यावर महिलांनीच अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. कोणालाही भावनिक बळी न पडला धैर्याला आलेल्या गोष्टींचा सामना करण्याची गरज आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. या घटनेत तब्बल 10 महिले महिलेची फसवणूक केली जात आहे.
इंदूरमध्ये तरुणीसोबत स्टॉक मार्केट संचालकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तरुणीने संचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरुणी स्टॉक मार्केटमध्ये असिस्टंट डायरेक्टरच्या पदावर होती. तिची नियुक्ती संचालक विक्रम यांनीच केली होती. हे ही वाचा- नालासोपाऱ्यात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; अडीच लाखांचे कंडोम जप्त, चौघींची सुटका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय तरुणी झालावाडमध्ये राहते. तरुणीने सांगितलं की, ती काही वर्षांपूर्वी इंदूरला आली होती. 2 जुलै 2020 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्रम सिसौदिया याच्यासोबत तिची मैत्री झाली. दोघेही एकमेकांना पसंत करीत होते. आरोपीने तरुणीसोबत लग्न करण्याचं वचन दिलं होतं. त्यानंतर विक्रमने हायकोर्टासमोरील राजानी भवन येथे पाचव्या मजल्यावर स्टॉक मार्केटमधील ऑफिसमध्ये तरुणीला असिस्टंट डायरेक्टर पदावर नोकरी दिली होती. तिला ऑफिस सांभाळायलादेखील सांगण्यात आलं होतं. मात्र 10 महिने काम केल्यानंतरही तिला सॅलरी देण्यात आली नाही. इतकच नाही तर लग्नाचं आमिष दाखवून अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने यासंदर्भात गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीविरोधात बलात्कारसह अन्य कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
17 फ्रेब्रुवारी 2021 रोजी विक्रमने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं आणि इम्पिरियल हॉटेलमध्ये तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. यानंतर तरुणीने आपला कामावरील पगार मागितला तर त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. आणि त्यानंतर फोन उचलणं बंद केलं. हताश झालेल्या तरुणीने आरोपी विक्रम सिसौदिया याच्या विरोधात पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.