नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : गुन्हेगार कितीही हुशार राहिला तरी त्याचे कधी ना कधी दिवस भरतातच. कारण चुकीच्या गोष्टी या माणसाला तात्पुरता सुख देतात. पण नंतर त्याचे फळ भोगावेच लागते. याशिवाय सरतेशेवटी सत्याचा विजय होतो, असं म्हणतात. तसेच शेवटी ‘कानून के हात लंबे होते है’, अशी हिंदीत एक म्हण आहे. याच म्हणीचा प्रत्यय दिल्लीत बघायला मिळाला आहे. दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात एक मोठा मासा अडकला आहे. हा मासा साधासुधा नाही तर खूप खतरनाक होता. त्याने आतापर्यंत कर्जाच्या नावाखाली शेकडो भारतीयांना कोट्यवधी रुपयांनी लुबाडलं. त्याची एक टोळीच भारतात कार्यरत होती. ही टोळी सर्वसामान्यांच्या मोबाईलवर कब्जा मिळवायची. त्यानंतर त्या मोबाईलमधील फोटो आणि इतर डेटा जप्त करायची. नंतर मार्फ केलेला फोटो नागरिकांना पाठवत ब्लॅकमेल करायची. तसेच फोटोंसह सर्व डेटा चीनच्या सर्व्हरला पाठवायची, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. आरोपींनी आतापर्यंत भारतीय नागरिकांची 500 कोटींची फसवणूक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 22 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 9 लॅपटॉप, 25 हार्डडिस्क आणि 51 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही गँग जवळपास 100 पेक्षा जास्त लोन अॅप्सच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना लुबाळत होती. या गँगने आतापर्यंत 500 कोटी रुपयांनी नागरिकांना फसवलं आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ( औरंगाबादमध्ये माणुसकी मेली, मृत्यूआधी महिलेच्या मदतीसाठी प्रचंड याचना ) कर्जाची खूप नितांत आवश्यकता असणाऱ्या नागरिकांना ही गँग लुबाळायची. ही गँग कर्जाची गरज असणाऱ्या नागरिकांना हेरायची. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अॅप डाऊनलोड करायला सांगायची. कर्जाची गरज असलेली भोळी माणसं आरोपींच्या जाळ्यात अडकायची. युजर अॅप डाऊनलोड करायची. त्यानंतर आरोपी संधी मिळताच युजरच्या मोबाईलवर ताबा मिळवायची. आरोपी युजरच्या मोबाईलमधील फोटो आणि महत्त्वाचा डेटा जप्त करायची आणि नंतर ब्लॅकमेलिंग करायची. आरोपी युजर्सचे मॉर्फ केलेले फोटो पाठवायचे आणि पैसे दिले नाही तर व्हायरल करण्याची धमकी द्यायची. त्यातून ते नागरिकांना प्रचंड लुबाळायचे. विशेष म्हणजे आरोपी एवढ्यावरच थांबायचे नाहीत. ते चीन, हाँगकाँगच्या सर्व्हरवर फोटो आणि इतर डेटा पाठवायचे. या कृत्यामध्ये चिनी नागरिकांचादेखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींचे संबंध हे फक्त चीनच नाही तर पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशातील आरोपींसोबत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 22 जणांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत. पोलिसांच्या सूचनेनुसार, या चिनी अॅप्सपासून सावध राहा Raise cash app PP money app Rupees master app Cash ray app Mobipocket app Papa money app Infinity cash app Kredit mango app Kredit marvel app CB loan app Cash advance app HDB loan app Cash tree app RAw loan app Under process Minute cash app Cash light app Cash fish app HD credit app Ruppes land app Cash room app Rupee loan app Well Kredit app लखनऊची गँग ‘या’ अॅप्सने नागरिकांना फसवायची 1. Cash Port 2. RupeeWay 3. LoanCube 4. WowRupee 5. SmartWallet 6. GiantWallet 7. HiRupee 8. SwiftRupee 9. Walletwin 10. Fishclub 11. Yeahcash 12. ImLoan 13. Growtree 14. MagicBalance 15. Yocash 16. FortuneTree 17. Supercoin 18. RedMagic
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.