मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

delhi crime news : अनैतिक संबंधांत अडसर ठरला, पत्नीनं प्रियकराच्या मदतीने केला पतीचा शेवट

delhi crime news : अनैतिक संबंधांत अडसर ठरला, पत्नीनं प्रियकराच्या मदतीने केला पतीचा शेवट

नैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच खून केल्याची दुर्दैवी घटना दिल्लीत उघड झाली आहे

नैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच खून केल्याची दुर्दैवी घटना दिल्लीत उघड झाली आहे

नैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच खून केल्याची दुर्दैवी घटना दिल्लीत उघड झाली आहे

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

नवी दिल्ली, 09 डिसेंबर : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच खून केल्याची दुर्दैवी घटना दिल्लीत उघड झाली आहे. पत्नी व तिच्या प्रियकराने पतीला आधी खूप दारू पाजली. त्यानंतर मारहाण करूनही त्याचा मृत्यू न झाल्याने घरातील पडदा व ओढणीने गळा दाबण्यात आला. पश्चिम दिल्लीतल्या मंडावली भागात हा प्रकार घडला. पोलिसांनी तत्परता दाखवून योग्य दिशेने तपास केल्यामुळे घटनेचा उलगडा झाला आहे. आरोपी पत्नी व प्रियकराला अटक करण्यात आली. ‘आज तक’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार डिसेंबर रोजी रेल्वे कॉलनी भागात राहणाऱ्या सुरेश नावाच्या व्यक्तीची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला एलबीएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, आपण दुःखात असल्याचं कारण देऊन पत्नीने पोलिसांच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. सुरेशचे नातेवाईक दिल्लीच्या जवळपासच्या भागात राहतात. त्यांना मृत्यूची वार्ता कळताच ते त्याच्या घरी आले; पण त्यापैकी कोणालाही सुरेशच्या खुनाचा संशय आला नाही.

हे ही वाचा : '...तर माझी मुलगी वाचली असती'; श्रद्धा वालकरच्या वडिलांचा वसई पोलिसांवर गंभीर आरोप

सात डिसेंबरला पोस्टमॉर्टेम झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह पत्नी हेमा व भाऊ दीपक यांच्याकडे सोपवला. सुरेशचं डोकं, मान, छाती आणि पोट, तसंच लिव्हरवर काही जखमा होत्या. मारहाण व श्वास रोखला गेल्यामुळे सुरेशचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नमूद केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी खुनाच्या दृष्टीने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एका पथकाची नेमणूक केली. या पथकाने सुरेशची पत्नी, मुलं आणि कुटुंबातले इतर सदस्य, तसंच शेजाऱ्यांची चौकशी केली; पण काही सुगावा लागला नाही.

चौकशीदरम्यान मृत सुरेशच्या पत्नीने दिलेल्या जबाबात तफावत आढळली. खुनाचा हा प्रकार सुरेशची पत्नी व तिचा प्रियकर सचिन यांनी मिळून केला असू शकतो, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हेमाला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला आणि तिने गुन्हा कबूल केला. हेमा व तिचा प्रियकर सचिन या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 'सप्टेंबरमध्ये आफताबला कॉल केला, त्याने सांगितलं की श्रद्धा..', वडील विकास वालकर यांचा खुलासा

दोन वर्षांपासून होते अनैतिक संबंध

पोलिसांच्या चौकशीत हेमा आणि तिचा प्रियकर सचिन यांनीच सुरेशचा गळा दाबून खून केल्याचं स्पष्ट झालं. हेमा आणि सचिन यांच्यामध्ये दोन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. ते दोघे एकत्र राहणार होते. परंतु सुरेश यात अडसर ठरल्याने त्याला संपवण्याचा कट रचण्यात आला. दोघांनी मिळून सुरेशला आधी खूप दारू पाजली. त्यानंतर घरातला पडदा आणि ओढणीने त्याचा गळा दाबला, असं हेमाने पोलिसांना सांगितलं.

First published:

Tags: Crime, Crime news, Delhi latest news, Delhi News, Delhi Police