भोपाळ, 6 मे : डीजेच्या तालावर नाचणारा एक विद्यार्थी अचानक बेशुद्ध होऊन खाली पडला. यातच त्याचा मृत्यू झाला. भर लग्नात घडलेल्या या घडनेमुळे अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. आता आनंदात नाचणाऱ्या मुलाचा डोळ्यांदेखत झालेल्या मृत्यूमुळे पाहुण्यांनाही धक्काच बसला आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) उज्जैन येथून ही घटना समोर आली आहे. काय आहे प्रकरण? उज्जैनच्या समीप ग्राम नारेला कला येथे राहणारा 18 वर्षीय लाल सिंह आपल्या मित्रांसह ताजपूर येथे लग्नासाठी गेला होता. ताजपूर येथे विजय सिंह यांच्या येथे आयोजित केलेल्या लग्न समारंभात तो सहभागी झाला होता. लग्नादरम्यान गावात मिरवणूक निघाली होती. या मिरवणूक लाल सिंहदेखील सामील झाला. तो आपल्या मित्रांसह डीजेच्या तालावर डान्स करीत होता. यादरम्यान काही क्षणात त्याची तब्येत बिघडली आणि खाली कोसळला. यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं. डॉक्टरांनी या प्रकरणात सांगितलं की, लाल सिंह याच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, त्याचा हार्ट फेल झाला. ही बाब हैराण करणारी आहे. डॉक्टर पुढे म्हणाले की, कधी कधी मोठ्या आवाजाचा परिणाम थेट हृदयावर होतो. यामुळे हृदयाचे ठोके थांबतात. या घटनेनंतर लग्न समारंभात शोककळा पसरली. हे ही वाचा- प्रेयसीच्या भावाने 13 वर्षांच्या लेकीला पळवून नेलं, पित्याने घेतला गळफास डान्स व्हिडीओदेखील व्हायरल.. लग्न समारंभादरम्यान डीजेच्या तालावर नाचणाऱ्या लाल सिंह याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे लाल सिंह यांचे मित्र दुखावले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.