Home /News /national /

प्रेयसीच्या भावाने 13 वर्षांच्या लेकीला पळवून नेलं, पित्याने गळफास घेऊन संपवलं जीवन

प्रेयसीच्या भावाने 13 वर्षांच्या लेकीला पळवून नेलं, पित्याने गळफास घेऊन संपवलं जीवन

 रामसिंहचे सोनी नावाच्या महिलेसोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. साधारण वर्षभरापूर्वी सोनीचा भाऊ रामसिंहच्या अल्पवयीन मुलीला (Minor Girl) पळून घेऊन गेला

रामसिंहचे सोनी नावाच्या महिलेसोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. साधारण वर्षभरापूर्वी सोनीचा भाऊ रामसिंहच्या अल्पवयीन मुलीला (Minor Girl) पळून घेऊन गेला

रामसिंहचे सोनी नावाच्या महिलेसोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. साधारण वर्षभरापूर्वी सोनीचा भाऊ रामसिंहच्या अल्पवयीन मुलीला (Minor Girl) पळून घेऊन गेला

    मध्य प्रदेश, 05 मे :  आपल्या मुलीचे प्रेयसीच्या भावाने अपहरण केले आणि मुलीला परत आणून देत नसल्याच्या कारणामुळे पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदुरमधील आझादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे, मृत रामसिंह (काल्पनिक नाव) याचे महिलेशी विवाहबाह्य संबंध (Extramarital Affair) होते. तिच्याच भावाने मुलीचे अपहरण करून लग्नाचा घाट घातला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामसिंहचे सोनी नावाच्या महिलेसोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. साधारण वर्षभरापूर्वी सोनीचा भाऊ रामसिंहच्या अल्पवयीन मुलीला (Minor Girl) पळून घेऊन गेला. गेल्या वर्षभरापासून तो मुलीसोबत राहत आहे.रामसिंह या प्रकरणाची पोलिसात तक्रार(Police Complaint) दाखल करणार होता. मात्र, प्रेयसी सोनीनं त्याला तसं करण्यापासून रोखलं. आपल्या भावाला तुझ्या मुलीशी लग्न करायचे आहे, असंही सांगितलं. तरीदेखील रामसिंहनं प्रेयसीकडे अनेक वेळा आपल्या मुलीची मागणी केली. यावर प्रेयसीनं सहमती दर्शवली नाही म्हणून कंटाळून रामसिंहनं गळफास लावून आत्महत्या केली. मरण्यापूर्वी त्यानं सुसाईड नोट लिहिली होती. ज्यामध्ये त्यानं आपल्या प्रेयसीचा उल्लेख करून तिच्यावर अत्याचाराचे आरोप लावले आहेत. शिवाय या नोटमध्ये त्यानं आपल्या मुलीच्या अपहरणाचीही माहिती दिली आहे, असं वृत्त आज तकनं याबाबत प्रसिद्ध केलं आहे. (हे ही वाचा-सरकारी शाळेतच चिमुरडीचा तडफडून मृत्यू; पाणी पिण्यासाठी गेली अन्...) 'मी राम सिंह सुसाईड करत आहे. बिचोली मर्दाना येथे राहणारी माझी प्रेयसी सोनी हिने तीन वर्षे माझा वापर केला. तिचा भाऊ माझ्या 13 वर्षाच्या मुलीला त्याच्यासोबत घेऊन गेला. सोनीने मला याबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई करू दिली नाही. यामुळे मी सन्मान गमावला आहे. माझ्या मृत्यूला सोनी, तिचा नवरा, भाऊ आणि तिचे आई वडील जबाबदार आहेत. त्यांना शिक्षा झाली पाहिजे,' अशी सुसाईड नोट मिळाल्याचं तपास अधिकारी (Investigating Officer) व्हीडी भारती यांनी सांगितलं आहे. (मुंबईचा विकासात परप्रांतींयाचे सुद्धा योगदान', मनसे नेत्याचं वक्तव्य) पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. पोलिसांनी रामसिंहचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. दोषींवर कारवाई केली जाईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. रामसिंहच्या चुकीमुळे त्यानं स्वत:चा जीव आणि मुलगी दोन्हीही गमावलं. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
    First published:

    पुढील बातम्या