जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / छाती फाडलेली अन् तोंडावर गंभीर जखमा, 10 वर्षांच्या कृष्णाचा मृतदेह पाहून पंढरपूरकर सुन्न

छाती फाडलेली अन् तोंडावर गंभीर जखमा, 10 वर्षांच्या कृष्णाचा मृतदेह पाहून पंढरपूरकर सुन्न

अनेक वर्षे बंद असलेल्या शौचालय जवळ छिन्नविछिन्न अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे.

अनेक वर्षे बंद असलेल्या शौचालय जवळ छिन्नविछिन्न अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे.

अनेक वर्षे बंद असलेल्या शौचालय जवळ छिन्नविछिन्न अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे.

  • -MIN READ Pandharpur,Solapur,Maharashtra
  • Last Updated :

पंढरपूर, 23 जानेवारी : पंढरपूरमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. शहरात एका दहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला. छिन्नविछिन्न अवस्थेत या मुलाचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मुलाचा खून कुणी आणि कशासाठी केला, याबद्दल प्रश्न उपस्थितीत झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी महात्मा फुले चौकात कृष्णा तीम्मा धोत्रेचा शौचालयजवळ आज सकाळी एका 10 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. अनेक वर्षे बंद असलेल्या शौचालय जवळ छिन्नविछिन्न अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे. कृष्णा असं या मुलाचं नाव आहे. (Instagram वर जुनैद झाला बंटी, प्रेमाच्या जाळ्यात फसवत तरुणीसोबत केलं भयानक कांड) धक्कादायक म्हणजे, कृष्णाची छाती पूर्ण फाडलेली आहे. हाताला दुखापत झाली आहे. मुलाचा मृतदेह आढळल्यामुळे शहरात वाऱ्यासारखी बातमी पसरली. ( संतापजनक! दारुच्या नशेत नवऱ्याचं बायकोसोबत विकृत कृत्य, घटनेने पोलीसही हादरले ) कृष्णाची नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आणि त्याचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. कृष्णाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. पोस्टमार्टम अहवालानंतर मृत्यूचे कारण समजणार आहे. मात्र, 10 वर्षीय कृष्णाचा खून झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. येवल्याच्या मुखेड-महालखेड पाटाजवळ आढळला महिलेचा मृतदेह दरम्यान, येवल्याच्या मुखेड- महालखेड परिसरातून वाहणाऱ्या पाटाजवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या महिलेचा निर्घृणपणे खून केल्याचा संशय पोलिसांना असून त्या दिशेने तपास केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात