मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /22 तास मृतदेह रुग्णालयातच पडून; बीडमध्ये प्रेताशेजारीच कोरोनाबाधित महिलांवर उपचार

22 तास मृतदेह रुग्णालयातच पडून; बीडमध्ये प्रेताशेजारीच कोरोनाबाधित महिलांवर उपचार

बीडमधील जिल्हा रुग्णालयात एका कोरोना रुग्णाचा (Corona Patient) मृतदेह तब्बल 22 तास पडून राहिला आहे. त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

बीड, 01 मे: सध्या राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) वेगात पसरत आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) अत्यंत धोकादायक ठरत असून कोरोना रुग्णांच्या मृत्यूची (Corona patients death rise) संख्याही वाढत आहे. अशात कोरोना रुग्णांच्या मृतदेहाची (Dead body) मोठ्या प्रमाणात हेळसांड झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. महाराष्ट्रातील बीडमधील जिल्हा रुग्णालयात एक मृतदेह तब्बल 22 तास पडून राहिला आहे. त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

गुरुवारी रात्री नऊ वाजता बीडच्या जिल्हा रुग्णालयात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. मृत्यू झाल्यानंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह जवळपास वीस तास कोविड वार्डातच पडून होता. विशेष म्हणजे या मृतदेहाशेजारी दोन महिलांवर उपचारदेखील सुरू होते. हा संतापजनक प्रकार जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग हॉस्टेलमधील कोविड वार्डात घडला आहे. हा मृतदेह 22 तास तसाच राहिल्यानं या कोविड वार्डात उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून मनोबलाचं खच्चीकरण होतं आहे.

हे ही वाचा-Corona Vaccine चं आमिष दाखवत तरुणीवर सामूहिक बलात्कार, 2 नराधमांना अटक

तब्बल वीस ते बावीस तास मृतदेह तसाच कोविड वार्डात पडून राहिल्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनानं तो बाहेर काढला आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र ही बाब उघड झाल्यानंतर नातेवाईकांसोबतचं रुग्णांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

First published:

Tags: Beed, Corona patient, Death