मुंबई, 28 डिसेंबर : ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांची पूर्वी पार्सल दगडविटांनी किंवा अन्य गोष्टींनी बदलून फसवणूक केली जात होती. मात्र, आता लोकांना लुटण्यासाठी फसवणुकीचा नवा प्रकार या सायबर गुन्हेगारांनी शोधला आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांनी फसवणुकीला सामोरे जाण्यासाठी वन टाइम पासवर्ड (OTP) प्रणाली सुरू केली. यामध्ये जेव्हा डिलिव्हरी एजंट ग्राहकांपर्यंत पोहोचतो तेव्हा त्यांना पार्सल मिळाल्यावर ओटीपी शेअर करावा लागतो. हे पार्सल संबंधित ग्राहकाला मिळाल्याची पुष्टी करते. आता हीच गोष्ट फसवण्यासाठीही वापरली जात आहे. त्यामुळे तुम्ही देखील ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर काळजी घेणे आवश्यक आङे.
घोटाळेबाज नेहमी नवीन मार्गांनी लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. आता सायबर गुन्हेगार ग्राहकांची लूट करण्यासाठी डिलिव्हरी एजंट असल्याचे दाखवून फसवणूक करत आहेत. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात गुन्हेगार डिलिव्हरी एजंट म्हणून लोकांच्या घरी पोहोचत आहेत आणि डिलिव्हरीपूर्वी OTP शेअर करण्यास सांगत आहेत. लोकांनी ओटीपी शेअर करताच ते फसवणुकीला बळी पडत आहेत.
वाचा - विवाहित प्रेयसीसोबत प्रियकराचं भयानक कृत्य, स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल
काय आहे फेक ओटीपी डिलिव्हरी स्कॅम?
वास्तविक, स्कॅमर्स ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करणाऱ्या अधिक लोकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासोबतच कोणते ग्राहक नियमितपणे पार्सल घेतात यावरही ठग लक्ष ठेवून असतात. यानंतर, डिलिव्हरी एजंट म्हणून ठग त्या ग्राहकांच्या घरी येतात आणि म्हणतात की अॅमेझॉन-फ्लिपकार्ट किंवा पोस्ट ऑफिसचे पार्सल हातात आहे. यानंतर, ठग लोकांकडे पैसे मागतात आणि त्यांच्याकडे डिलिव्हरीवर पैसे देण्याचा पर्याय असल्याचे सांगतात.
यावर, जर वापरकर्त्यांनी डिलिव्हरी घेण्यास नकार दिला तर ते पार्सल रद्द करत असल्याचे ठग सांगतात. यासाठी त्यांना एक OTP मिळेल, जो त्यांना शेअर करावा लागेल. अशा परिस्थितीत अनेकजण या भामट्यांच्या बोलण्याला बळी पडतात आणि ओटीपी देतात किंवा फोनवर मिळालेल्या लिंकवर क्लिक करून बसतात. हा ओटीपी स्कॅमरना मिळताच. ते फोन क्लोन किंवा हॅक करतात. त्यानंतर हॅकर्स फोनवरून बँकेचे तपशील चोरतात आणि लोकांचे पैसे लुटतात. अशा परिस्थितीत अशा गुंडांपासून सावध रहा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Online shopping