मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अंडरविअरमध्ये लपवलं लाखोंचं सोनं, अधिकाऱ्यांना लागली तस्करीची खबर आणि...

अंडरविअरमध्ये लपवलं लाखोंचं सोनं, अधिकाऱ्यांना लागली तस्करीची खबर आणि...

शारजाहून (Sharja) आलेल्या एका भारतीय व्यक्तीच्या अंडरविअरमधून (Underwear) पोलिसांनी तब्बल 43 लाख रुपयांचं सोनं (Gold worth Rs. 43 lakh) आणलं होतं.

शारजाहून (Sharja) आलेल्या एका भारतीय व्यक्तीच्या अंडरविअरमधून (Underwear) पोलिसांनी तब्बल 43 लाख रुपयांचं सोनं (Gold worth Rs. 43 lakh) आणलं होतं.

शारजाहून (Sharja) आलेल्या एका भारतीय व्यक्तीच्या अंडरविअरमधून (Underwear) पोलिसांनी तब्बल 43 लाख रुपयांचं सोनं (Gold worth Rs. 43 lakh) आणलं होतं.

  • Published by:  desk news

हैद्राबाद, 3 सप्टेंबर : एका देशातून दुसऱ्या देशात सोन्याची तस्करी (Gold Smuggling) करण्याचे अनेक प्रकार आतापर्यंत समोर आले आहेत. त्यातील बहुतांश प्रकार हे कस्टम विभागानं (Custom department) हाणून पाडले आहेत. अगदी बुटाच्या सोलपासून ते गिळलेल्या गोळीपर्यंत अनेक क्लुप्त्या लढवून तस्कर सोन्याची चोरी करण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच प्रकारे विचित्र ठिकाणी सोनं लवपून आणताना एका नागरिकाला हैद्राबाद विमानतळावर अटक करण्यात आली आहे.

अशी पकडली चोरी

शारजाहून (Sharja) आलेल्या एका भारतीय व्यक्तीच्या अंडरविअरमधून (Underwear) पोलिसांनी तब्बल 43 लाख रुपयांचं सोनं (Gold worth Rs. 43 lakh) आणलं होतं. या सोन्याचं वजन होतं 895.20 ग्रॅम. हे सोनं लपवण्यासाठी त्याने स्वतःच्या अंडरविअरचा वापर केला. विमानात बसण्यापूर्वी त्याने हे सोनं वितळवलं. त्या सोन्याची पेस्ट बनवली आणि ही पेस्ट त्याने स्वतःच्या अंडरविअरमध्ये लपवली. मात्र अधिकाऱ्यांना या गोष्टीची अगोदरच टीप मिळाल्यामुळे त्यांनी या व्यक्तीला विमानतळावर रंगेहाथ अटक केली. हे सोनं कुठून आणलं आणि त्याच्या इतर तपशीलांबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

हे वाचा - माथेफिरू जावयाने गाठला क्रूरतेचा कळस! सासरच्या मंडळींना जिवंत जाळलं

नियम काय सांगतो?

परदेशातून भारतात येणाऱ्या व्यक्तींसाठी सीमाशुल्क विभागानं काही नियम निश्चित केले आहेत. सोनं, चांदी, इतर दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू यांच्या प्रमाणाविषयीचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. सोन्याच्या बाबतीतील नियमानुसार एका वर्षापेक्षा जास्त काळ परदेशात राहणाऱ्या व्यक्तींपैकी पुरुषांना जास्तीत जास्त 20 ग्रॅम सोने आणण्याची परवानगी आहे. तर महिलांना जास्तीत जास्त 40 ग्रॅम सोनं आणण्याची परवानगी आहे. यापेक्षा अधिक सोनं घेऊन यायचं असेल, तर त्याचे तपशील सीमाशुल्क विभागाकडे सादर करावे लागतात. एखाद्या व्यक्तीने परदेशात अधिकृतरित्या सोन्याची खरेदी केली असेल, तर त्या व्यवहाराच्या पावत्या कस्टम विभागाला सादर कराव्या लागतात. मात्र कुठलाही पुरावा किंवा कागदपत्रं नसताना मर्यादेपेक्षा आणलेलं अधिक सोनं हा प्रथमदर्शनी तस्करीचा प्रयत्न मानला जातो.

First published:

Tags: Crime, Gold, Hyderabad, Smuggling