नवी दिल्ली, 11 जानेवारी: सध्या देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची दहशत आहेच, पण त्याचबरोबर देशात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. गेल्या काही दिवसांत देशात महिला अत्याचाराच्या बाबतीत क्रूरतेच्या परिसीमा गाठणाऱ्या 5 धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये पीडित महिलांमध्ये अगदी 13 वर्षाच्या निष्पाप मुलीपासून ते 50 वर्षाच्या विधवा महिलेचा समावेश आहे. हैवानांनी पीडित महिलेला आपल्या वासनेचा शिकार बनवताना क्रूरतेच्या सर्व सिमा गाठल्या आहेत.
1. मध्यप्रदेशात एका विधवा महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार करुन महिलेच्या गुप्तांगात लोखंडी सळई खुपसली
मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यात तीन तरुणांनी एका विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई खूपसली आहे. या पीडित महिलेच्या पतिचा मृत्यू चार वर्षांपूर्वी झाला होता. ती आपल्या दोन मुलांसोबत एका झोपडीत राहून दुकान चालवण्याचं काम करत होती. शनिवारी (3 जानेवारी) रात्री गावातील तीन आरोपींनी पीडित महिलेला पाणी मागितलं. घरात पाणी नसल्याचं तिने सांगताच या तीन युवकांनी झोपडीच्या काड्या मोडून आत प्रवेश करून महिलेवर सामुहीक बलात्कार केला. त्यानंतर तिच्या गुप्तांगात लोखंडी सळईही घुसवण्यात आली.
2. मंदिरात पूजेसाठी गेलेल्या अंगणवाडी कर्मचारी महिलेचा सामूहिक बलात्कार आणि खून
पूजा करण्यासाठी मंदिरात गेलेल्या 50 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या महिलेच्या शवविच्छेदनातून मन हेलावून टाकणारी माहिती समोर आली आहे. या महिलेच्या गुप्तांगात रॉड खुपसण्यात आला होता. याशिवाय डावी बरगडी, पाय आणि फुफ्फुसांना देखील गंभीर इजा पोहोचली होती. डावा पाय आणि बरगडी आतून तुटली होती. महिलेचा अति रक्तस्राव झाल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ही संबंधित घटना उत्तरप्रदेशातील आहे.
3. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
शनिवारी रात्री पीडित मुलीचे आईवडिल कामावरून घरी परत आले असता, त्यांना त्यांची मुलगी घरात सापडली नाही. तेव्हा त्यांनी आपल्या मुलीचा शोध घेतल्यानंतर ती जवळच्या एका घराच्या छतावरुन रडताना दिसली. तेव्हा तिला रडण्याचं कारण विचारलं असता, तिनं आपल्यासोबत सामुहीक बलात्कार झाल्याची माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह सहा जणांना अटक केली आहे. घटनेतील आरोपी महिलेनं बलात्कार करण्यासाठी आरोपींना मदत केली होती.
4. मेहुण्याला मारहाण आणि मुलीवर सामूहिक बलात्कार
नवीन वर्षाच्या निमित्तानं एक मुलगी आपल्या मेहुण्यासोबत गढपहराच्या जंगलात फिरण्यासाठी गेली होती. त्याचवेळी तिथे चार लोकं आली आणि त्यांनी मेहुण्याला मारहाण करून मेहुण्यासमोरच पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार केला. हे हैवान एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी या घटनेचा व्हिडिओही बनवला. संबंधित घटना मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी या चार जणांची झडती घेतली असता त्यांच्या मोबाइलमध्ये संबंधित घटनेचा व्हिडिओ मिळाला आहे.
5. 50 वर्षाच्या विधवा महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात स्टीलचा ग्लास खूपसला
ही घटना झारखंड राज्यातील चतरा येथील आहे. या घटनेत तीन हैवानांनी 50 वर्षाच्या विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिच्या गुप्तांगात स्टीलचा ग्लास खुपसला आहे. पीडित महिला रात्री दहाच्या सुमारास शौचालयाला गेली होती. त्यावेळी तीन आरोपींनी तिचं तोंड दाबून तिला उचलून थोड्याशा दूर अंतरावर नेलं आणि तिथे तिच्यावर एका पाठोपाठ एक असं सर्वांनी बलात्कार केला. शिवाय संबंधित घटनेची माहिती कोणाला सांगितली तर कुटुंबातील व्यक्तींना जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.