Murder: आधी पत्नीची हत्या मग पोलिसांवर गोळीबार करुन आत्महत्या करत संपवलं जीवन

Murder: आधी पत्नीची हत्या मग पोलिसांवर गोळीबार करुन आत्महत्या करत संपवलं जीवन

एका व्यक्तीनं आपल्याच पत्नीची निर्दयीपणे हत्या (Man Killed His Wife) केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आरोपीनं स्वतः पोलिसांना फोन करुन पत्नीची हत्या केल्याची माहिती दिली होती.

  • Share this:

नवी दिल्ली 20 फेब्रुवारी : एका व्यक्तीनं आपल्याच पत्नीची निर्दयीपणे हत्या (Man Killed His Wife) केल्याचं वृत्त समोर आलं आहे. यानंतर आरोपीनं पोलिसांवरच हल्ला करण्यास सुरूवात केली. यात दोन पोलीस जखमी झाले. यानंतर पोलिसांनी तावडीतून आपली सुटका होणार नाही, हे समजताच त्यानं स्वतःला गोळी घालून घेत आत्महत्या (Commited Suicide)केली आहे. ही घटना अमेरिकेच्या दल्लासमध्ये घडली आहे.

आरोपीचं नाव सेर्गियो सैनचेज असं होतं. सेर्गियोनं गुरूवारी आपल्या 31 वर्षाच्या पत्नीची हत्या केली. सेर्गियोचं वय 57 वर्ष होतं. हा आरोपी आधीच अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी आढळून आला होता. यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात जायचं नसल्यानं त्यानं पोलिसांच्या टीमवर हल्ला केला. पोलीस चीफ गार्सिया यांनी शुक्रवारी याबद्दलची माहिती दिली.

गार्सिया यांनी सांगितलं, की सेर्गियानं स्वतः पोलिसांना फोन करुन पत्नीची हत्या केल्याची माहिती दिली होती. सेर्गियानं सांगितलं, की त्याची पत्नी त्याच्यासोबत भांडण करत असल्यानं त्यानं तिची हत्या केली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यानं पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. यात 2 पोलीस जखमी झाले. मात्र, यानंतर सेर्गियाची तिथून पळ काढण्याची योजना फसल्यानंतर त्यानं स्वतःला गोळी मारुन घेतली. तो पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला नसल्याचं स्पष्टीकरण गार्सिया यांनी दिलं आहे.

डेल मेलच्या वृत्तानुसार, गार्सिया यांनी सांगितलं, की सेर्गिया याआधीही 12 वर्ष तुरुंगात होता. 1983मध्ये सेर्गियानं एका 32 वर्षाच्या महिलेचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला होता. 1984 मध्ये त्याला अपहरणाच्या गुन्ह्यात तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. यानंतर 1996 मध्ये सेर्गियाची सुटका झाली होती. पोलीस अधिकाऱ्यानं पुढे सांगितलं, की 1996 मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर 3 महिन्यातच त्यानं शाळेत जाणाऱ्या एका 15 वर्षाच्या मुलीचं अपहरण केलं आणि तिच्यावरही बलात्कार केला. यानंतर पुन्हा एकदा सेर्गियोची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.

Published by: Kiran Pharate
First published: February 20, 2021, 8:54 AM IST

ताज्या बातम्या