जाहिरात
मराठी बातम्या / Viral / विद्यार्थ्याकडून मसाज करून घेतानाचा शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल, शिक्षिकेवर बडतर्फीची कारवाई

विद्यार्थ्याकडून मसाज करून घेतानाचा शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल, शिक्षिकेवर बडतर्फीची कारवाई

विद्यार्थ्याकडून मसाज करून घेतानाचा शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल, शिक्षिकेवर बडतर्फीची कारवाई

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हरदोई येथील एका सरकारी शाळेतील शिक्षिकेचा मुलांकडून मसाज करून घेतानाचा (Video Of Student Massaging Teacher) एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • -MIN READ Trending Desk Viralimalai,Pudukkottai,Tamil Nadu
  • Last Updated :

    देशात अनेक क्षेत्रात गैरव्यवहार होताना आपण पाहिलं आहे. शिक्षणाचं (Education) पवित्र क्षेत्रही त्यातून सुटलेलं नाही. सरकारी असो किंवा खासगी शाळा मुलांच्या भवितव्यासाठी झटणारे शिक्षक, इतर सेवक यांच्याकडून अनेक चुकीच्या गोष्टी घडत आहेत. पुढच्या पिढ्यांचं भविष्य घडवणारे हात या गैरव्यवहारांच्या चिखलात बरबटले जात आहेत. उत्तर प्रदेशात शिक्षकांच्या गैरव्यवहाराच्या दोन घटना उघडकीला आल्या आहेत. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हरदोई येथील एका सरकारी शाळेतील शिक्षिकेचा मुलांकडून मसाज करून घेतानाचा (Video Of Student Massaging Teacher) एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर आता त्या शिक्षिकेला बडतर्फ करण्यात आलं आहे. हरदोईमधील पोखरी प्राथमिक विद्यालयात हा प्रकार घडला. उर्मिला सिंह या त्या शाळेत सहशिक्षिका म्हणून काम करतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओत त्या एका खुर्चीत बसलेल्या दिसतात. वर्गातच इतर मुलांसमोर एक विद्यार्थी त्या शिक्षिकेच्या हाताला मसाज करताना व्हिडिओत दिसत आहे. ग्रेडिंग न्यूजच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘शिक्षिका विद्यार्थ्यांकडून बायसेप मसाज घेताना..’ यूपीतील हरदोईमधील व्हायरल व्हिडिओ.’ अशा ओळी व्हिडिओसोबत दिल्या आहेत.o दरम्यान, “हा व्हिडिओ सोशल मीडियावरूनच आम्हाला मिळाला. प्रथमदर्शनी शिक्षिका दोषी आढळल्या आहेत. त्यांच्यावर बडतर्फीची (Teacher Suspended) कारवाई सुरु करण्यात आली आहे,” असं हरदोईमधील बेसिक शिक्षण अधिकारी बी. पी. सिंह यांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितलं.

    जाहिरात

    व्हिडिओ अपलोड झाल्यापासून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “मुलांकडून काम करून घेताहेत. यांच्यासारख्यांमुळेच सरकारी शाळा बदनाम होत आहेत. यांना नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे.” असं एकानं लिहिलं आहे. तर “व्हॉट अ शेम” अशी प्रतिक्रिया दुसऱ्यानं दिली आहे. दुसऱ्या एका व्हिडिओत उत्तर प्रदेशातीलच एका शाळेत इंग्रजीच्या शिक्षिकेची दैन्यावस्था दिसते आहे. उन्नाव जिल्ह्यातल्या एका सरकारी शाळेत अचानक इन्स्पेक्शन झालं. त्यावेळी इंग्रजीच्या शिक्षिकेला पुस्तकातील चार इंग्रजी ओळीही वाचता (English Teacher Can’t Read Few English Lines) आल्या नाहीत. शिक्षणाची ही दूरवस्था दाखवणारा हा व्हिडिओसुद्धा प्रचंड व्हायरल झाला. ( पोटच्या पोराला वाचवण्यासाठी आईने झेलला वार, पंढरपुरात तलवारीच्या हल्ल्यात महिलेचा पंजा हातावेगळा )

    शाळेला भेट दिलेल्या जिल्हा न्यायाधीश देवेंद्र कुमार पांडे यांचा संताप त्या व्हिडिओत स्पष्ट दिसतो आहे. “या इंग्रजीच्या शिक्षिका आहेत आणि त्यांना इंग्रजी नीट वाचताही येत नाही. यांना तत्काळ बडतर्फ केलं पाहिजे”, असं त्यांनी म्हटल्यावर सारवासारव करणाऱ्या शिक्षिकेला पांडे यांनी त्यांना मध्येच थांबवत म्हटलं, “म्हणून काय झालं, तुम्ही बी.ए. पास आहात ना? मी तर तुम्हाला भाषांतरसुद्धा करायला सांगितलेलं नाही. फक्त पुस्तकातल्या चार ओळी वाचायला सांगितल्या, तर तेवढंही तुम्हाला जमलं नाही?”

    एकीकडे शिक्षक आणि मुलांमधील घट्ट नात्याचे, शिक्षणाचे चांगले व्हिडिओ व्हायरल होत असताना एखादा शिक्षणाच्या दूरवस्थेचा व्हिडिओ वास्तवाची जाणीव करून देतो. अजूनही देशातल्या दुर्गम भागात, खेडोपाड्यात चांगल्या दर्जाचं शिक्षण देणं गरजेचं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात