नवी दिल्ली 02 डिसेंबर : सुपर वापर समजल्या जाणाऱ्या अमेरिकेतील एका कायद्याच्या दुरुपयोगाचं प्रकरण समोर आलं आहे. यात बलात्काराच्या खोट्या आरोपात एका व्यक्तीला 16 वर्ष तुरुंगात राहावं लागलं. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा या प्रकरणावर अखेरचा निर्णय सुनावला तेव्हा हे प्रकरणच खोटं असल्याचं समजलं (Fake Rape Allegation). यानंतर 16 वर्ष तुरुंगात काढलेल्या बलात्काराच्या आरोपीला निर्दोष घोषित करत त्याची मुक्तता करण्यात आली.
ज्या महिलेनं बलात्काराचा खोटा आरोप केला होता (Fake Rape Case), तिने आपल्यासोबत घडलेल्या त्या कथित बलात्काराच्या घटनेच्या आधारे एक पुस्तकही लिहिलं. हे पुस्तक बेस्ट सेल बुक (Best Seller Book) या श्रेणीमध्येही आहे. या पुस्तकाचं नाव लव्हली बून्स असून ते एलिस सेबोल्ड नावाच्या लेखिकेनं लिहिलं आहे. एलिसाने केलेल्या खोट्या बलात्काराच्या आरोपात 61 वर्षाच्या अँथनी ब्रायवाटरला तुरुंगात जावं लागलं. 16 वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर कोर्टाने आता या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे.
एलिस हिने साल 1981 मध्ये लावलेल्या खोट्या बलात्काराच्या आरोपांसाठी माफी मागितली आहे. 1982 साली अँथनी एका युनिव्हर्सिटीमध्ये एलिस हिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपात दोषी आढळला होता. मात्र अँथनी निर्दोष असल्याचं तेव्हा समोर आलं जेव्हा नेटफ्लिक्सच्या एका निर्मात्याने एलिसच्या कथेतील गडबड पकडली. यानंतर त्यांनी एका प्रायव्हेट खबऱ्याला या प्रकरणाचा तपास करायला लावला.
जेलमध्ये बंद असताना या १६ वर्षांमध्ये ५ वेळा जेव्हा जेव्हा अँथनीला पॅरोल मिळणार होती तेव्हा तेव्हा त्याला ती नाकारण्यात आली. कोर्टाचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत अँथनी आपला गुन्हा मान्य करणार नाही तोपर्यंत त्याची पॅरोलवर काही काळाकरताही सुटका होणार नाही. इतकंच नाही तर जेलमध्ये दोन वेळा त्याची लाय डिटेक्टर टेस्टदेखील झाली. दोन्ही टेस्टमध्ये तो पास झाला मात्र तरीही त्याला तुरुंगात राहावं लागलं.
मागील आठवड्यात न्यूयॉर्क स्टेट सुप्रीम कोर्टानी अँथनी याची या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. तुरुंगातून बाहेर पडताच त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले. त्याला या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये, की त्याला १६ वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. एलिसनेही यानंतर त्याची माफी मागितली. यावर अँथनीने म्हटलं, की एलिसने माझी माफी मागितली त्यामुळे मला दिलासा मिळाला. यासाठी खूप धाडसाची गरज असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Rape accussed, Rape case