जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / नदी किनारी सुरू होता लग्नाचा फोटोशूट; काही सेकंदात नवं आयुष्य सुरू करण्यापूर्वीच संपलं

नदी किनारी सुरू होता लग्नाचा फोटोशूट; काही सेकंदात नवं आयुष्य सुरू करण्यापूर्वीच संपलं

नदी किनारी सुरू होता लग्नाचा फोटोशूट; काही सेकंदात नवं आयुष्य सुरू करण्यापूर्वीच संपलं

फोटो हे आनंदाच्या आठवणींसाठी असतात. येथे मात्र हेच फोटो आयुष्यभराचं दु:ख देऊन गेले.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोझिकोड, 4 एप्रिल : लग्नाला अवघे 20 दिवसच झाले होते की, नवरा आणि नवरीसोबत केरळमध्ये नदी किनारी फोटो शूट (Couple was taking photo near river) करताना अपघात झाला. ही घटना केरळमधील (Keral News) जानकीकाडूनजवळील कुट्टियाडी नदीच्या किनारी घडली आहे. सोमवारी येथे नवरा आणि नवरी फोटोशूटचा आनंद घेत होते. यादरम्यान नवरदेवाचा पाय सरकला आणि सोबतच नवरीदेखील वाहत्या पाण्यात वाहू लागली. या घटनेत नवरदेवाचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात

नवरी पाण्यात बुडताना पाहून तिला वाचवण्यात यश आलं आणि एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातात नवरीलाही गंभीर जखम झाली आहे. 14 मार्च रोजी दोघं लग्न बंधनात अडकले होते. नवरदेवाचं नाव रेजिल असल्याचं समोर आलं असून तो पेरंबराजवळील कांडियगडचा राहणारा होता.

नवरदेवाला पोहता येत नव्हतं… पेरूवन्नमुझी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यात कुट्टियाडी नदीजवळ अनेक पर्यटकांच्या मृत्यूचे वृत्त समोर आले आहेत. पर्यटकांना नदीमधील खोल खड्ड्यांबाबत माहिती नसते. आणि ते उत्साहाच्या भरात नदीत जातात. रेजिलला पोहता येत नव्हतं. खडकावरुन पाय घसरल्यानंतर तो नदीतील खोल खड्ड्यात अडकला आणि श्वास गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अद्याप तपास सुरू आहे. तपासाअंती घडलेल्या प्रकाराबद्दल नेमकं सांगता येईल.

हे ही वाचा- अमरावती: मध्यरात्री सासरवाडीत गेला जावई अन् सासूसोबत केलं भयंकर कृत्य

नवरदेवाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्याने अनेक कारणांमुळे आऊटडोर वेडिंग शूट 4 एप्रिलपर्यंत पोस्टपोंड करण्यात आली होती. सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून फोटोशूट सुरू केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात