मुंबई, 02 एप्रिल: आर्यन खान ड्रग प्रकरणातील (Cordelia cruise drug case) साक्षादीराचा मृत्यू झाल्याची घटना समोर (Witness in Cordelia Cruise Drug Case) आली होती. प्रभाकर साईल असं मृत्यू (Prabhakar Sail no more) झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
चेंबुरच्या माहुल परिसरात असणाऱ्या त्याच्या घरी त्याला शुक्रवारी सकाळपासून त्रास जाणवू लागला होता. छातीतल दुखू लागल्याने त्याला दवाखान्यात आणण्यात आलं आणि त्यावेळीच त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. प्रभाकरवर उपचार करण्यासाठी वेळच मिळाला नाही, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले होते अशी माहिती समोर येते आहे. प्रभाकर साईलच्या मृतदेहाचे राजावाडी सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन झाले असून, त्यानुासर अशी प्राथमिक माहिती मिळाली की या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील (Aryan Khan Drugs Case) साक्षीदाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.
प्रभाकर साईल संदर्भातील अहवाल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मागितला आहे. या ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलच्या मृत्यूची चौकशी महाराष्ट्र पोलीस करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी दिली. साईलच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत पाटील म्हणाले की, अनेकांना त्यांच्या निधनाची शंका होतीच आणि एवढ्या धडधाकट माणसाचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कसे निधन होते?
तर याप्रकरणी एक मागणी देखील डोकं वर काढत आहे. ती म्हणजे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी अशी मागणी केली आहे की प्रभाकर साईल याच्या मृत्यूची सीआयडी चौकशी केली जावी.
हे वाचा-मुंबई : एक्स बॉयफ्रेंडचा बारबालेसह तिच्या बहिणीवर ब्लेडने हल्ला; धक्कादायक कारण समोर
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये उघड झालेल्या मुंबई ड्रग्ज बस्ट प्रकरणातील साक्षीदार साईलचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ऑक्टोबर 2021 मध्ये, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 20 जणांना अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला. प्रभाकर साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aryan khan, Drug case, Drugs