Home /News /crime /

संतप्त जमावाच्या मारहाणीत किशनगंजच्या पोलिसाचा मृत्यू, पळ काढणाऱ्या 7 अधिकाऱ्यांना केलं निलंबित

संतप्त जमावाच्या मारहाणीत किशनगंजच्या पोलिसाचा मृत्यू, पळ काढणाऱ्या 7 अधिकाऱ्यांना केलं निलंबित

लूटमारीच्या प्रकरणात छापेमारी करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला संतप्त जमावाने चिरडल्याची (Police officer mob lynching) घटना समोर आली होती. याप्रकरणी आता सात अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

    पाटणा 11 एप्रिल: दरोडा आणि लूटमारीच्या प्रकरणात छापेमारी करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला संतप्त जमावाने चिरडल्याची (Police officer mob lynching) घटना समोर आली होती. दरोडेखोरांनी अचानक केलेल्या हल्ल्यात छापेमारी (Police Raid) करण्यासाठी आलेल्या पथकानं घटनास्थळावरून पळ काढला. मात्र एका पोलीस अधिकाऱ्याला आरोपींनी पकडलं. त्यानंतर आरोपींनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर सर्व राग काढला आणि त्यांना बेदम मारहाण केली आहे. या दुर्दैवी घटनेत संबंधित पोलीस अधिकाऱ्याचा जागीच जीव गेला आहे. या प्रकरणी आता मंडळ निरीक्षकासह सहा पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. एका लुटमारीच्या प्रकरणात छापेमारी करण्यासाठी ते बंगालमध्ये गेले होते. यावेळी घटनेच्यावेळी संबंधित मृत पोलीस अधिकारी अश्विनी कुमार (Ashwini Kumar) यांना एकटं सोडून पळ काढल्यारप्रकरणी इतरांवर ही कारवाई करण्यात आली आहे. बिहारच्या किशनगंज पोलीस ठाण्याचे एसपी कुमार आशिष यांनी याबद्दल माहिती दिली आहे. काय होती घटना - मृत अश्विनी बिहारमधील किशनगंज नगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार होते. एका लुटमारीच्या प्रकरणात छापेमारी करण्यासाठी ते बंगालमध्ये गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलिसांचं एक विशेष पथकही होतं. दरम्यान हिंसक जमावाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली आहे. या प्रकरणानंतर पोलीस विभागात संताप व्यक्त केला जात आहे. मृत पोलीस ठाणेदार अश्विनी कुमार एका लुटमारीच्या प्रकरणाचा तपास करत होते. यावेळी बिहारमध्ये घडलेल्या या गुन्ह्याचे धागेदोरे परराज्याशी जुडलेले आढळले. त्यामुळे अश्विनी कुमार आपल्या काही कर्मचाऱ्यांसोबत छापेमारी करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये गेले होते. यावेळी पश्चिम बंगालच्या दिनाजपूर जिल्ह्यातील पांजीपाडा पोलीस हद्दीतील पनतापाडा गावात छापेमारी सुरू केली होती. दरम्यान अपराध्यांना वाचवण्यासाठी गावातील जमावानं पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. ही घटना शनिवारी पहाटे चार वाजता घडली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Attack on police, Crime news, Murder news

    पुढील बातम्या