मुंबई, 27 मे : मुंबई म्हटलं की उंचच उंच इमारती आल्याच. जमिनीवर उभं राहून या इमारतींकडे पाहिलं की धडकी भरते आणि इमारतीवरून खाली जमिनीकडे पाहिलं की काळजात धस्सं होतं. कित्येकांना तर अशा उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली पाहताच चक्कर येते. पण अशाच इमारतीवर एका तरुणाने खतरनाक स्टंट केला आहे
(Stunt video viral). जो पाहून काळजाचा ठोकाच चुकेल
(Man rooftop jump in mumbai).
मुंबईतील इमारतीवर स्टंट करणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे
(Man jumped from building). जो पाहून सर्वांना धडकी भरली आहे. थोडी जरी चूक झाली असतील तरी हा स्टंट या तरुणाच्या जीवावर बेतू शकला होता. आता असं या तरुणाने नेमकं काय केलं आहे हे जाणून घेण्याची किंवा पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. या तरुणाने बिल्डिंगच्या गच्चीवर धावत एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उडी मारली आहे.
व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक तरुण गच्चीवर काही स्टंट करत येतो. तो कोलांटउडी घेतानाही दिसतो. असं करत तो ब्लिडिंगच्या रेलिंगपर्यंत येतो. त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता ही बिल्डिंग किती उंच आहे. तो तरुण तिथंच थांबतो.
हे वाचा - बापरे! सोफ्यावर बसल्या बसल्या अचानक हवेत उडाला तरुण; नेमकं काय घडलं पाहा VIDEO
इतक्या दुसऱ्या बाजूला आणखी एक तरुण दिसतो. तो रेलिंगवर उभा आहे. रेलिंगवर धावत तो बिल्डिंगवरून उडी मारतो. त्याचवेळी आपल्या अंगावर अक्षरशः काटा येतो. व्हिडीओचा शेवटही तितकाच धक्कादायक आहे. अशीच उडी मारत हा तरुण समोर असलेल्या दुसऱ्या बिल्डिंगच्या गच्चीवर जातो. जेव्हा हा तरुण तिथं सुखरूप पोहोचतो तेव्हा कुठे आपल्या जीवात जीव येतो.
रेलिंगवरून धावताना याचा पाय थोडा जरी घसरला असता किंवा समोरच्या बिल्डिंगवर जाताना त्याचं लक्ष्य थोडं जरी चुकलं असतं तरी त्याचा जीव गेला असता.
हे वाचा - आग लागताच धावू लागले पेट्रोल पंपाजवळील लोक; धाडसी महिलेनं वाचवला सगळ्यांचा जीव, VIDEO
@parkour_tribe इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे मुंबईतील रूफटॉप जम्प आहे. या व्हिडीओतील तरुण प्रोफेशनल अॅथलिट पार्कर आहे. ज्याच्याकडे स्टंटचा 14 वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे कृपया हा व्हिडीओ पाहून तुम्ही काही असा जीवघेणा स्टंट करण्याचा प्रयत्न करू नका, इतकं आवाहन.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.