जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / लहान मुलांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरणं किती सुरक्षित? नव्या संशोधनातील निष्कर्षानं उडेल झोप!

लहान मुलांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरणं किती सुरक्षित? नव्या संशोधनातील निष्कर्षानं उडेल झोप!

लहान मुलांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरणं किती सुरक्षित? नव्या संशोधनातील निष्कर्षानं उडेल झोप!

मुलांची इंटरनेट अ‍ॅक्टिव्हिटी वाढल्यामुळे आता नवा धोका समोर येऊ लागला आहे. याबाबतचा एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 19 जानेवारी : स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर आता सामान्य गोष्ट झाली आहे.  बदलत्या काळात प्रामुख्याने कोरोनानंतर टेक्नॉलॉजीचा वापर आणि त्याचा माणसाच्या जीवनावरील परिणाम वाढला आहे. लहान मुलंही इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर करू लागली आहेत. मुलांची इंटरनेट अ‍ॅक्टिव्हिटी वाढल्यामुळे आता नवा धोका समोर येऊ लागला आहे. गुन्हे करण्याच्या इराद्यानेही अनेक जण इंटरनेटवर सक्रिय होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत अशा गुन्हेगारांपासून मुलांना कसं वाचवायचं, हे आव्हान आता पालकांसमोर निर्माण झाले आहे. नुकताच याबाबतचा एक रिसर्च रिपोर्ट समोर आला असून तो धक्कादायक आहे. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय. काय आहे रिपोर्ट? या सर्वेक्षणात 424 पालकांनी सहभाग घेतला होता. यापैकी 33 टक्के लोकांनी ऑनलाइन सर्फिंग करताना अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या मुलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. या लोकांनी मैत्री करण्यासोबतच मुलांची वैयक्तिक आणि कौटुंबिक माहितीही विचारली. एवढंच नाही तर अज्ञात लोकांनी मुलांना सेक्सशी संबंधित माहितीही दिली. ज्या अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या मुलांशी संपर्क साधला त्यांनी मुलांसोबत अश्लील कंटेंटही शेअर केला, असं पालकांनी सांगितलं. शाळेच्या ड्रेस कोडने घेतला जीव? मैत्रिणीशी बोलताना अचानक कोसळली अन् भयंकर घडलं! हा रिसर्च करण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातील 424 पालकांव्यतिरिक्त, तीन राज्यांतील (पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र) 384 शिक्षक आणि 107 लोकांचाही समावेश करण्यात आला होता. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पालकांच्या मते, ऑनलाइन लैंगिक छळाचा बळी ठरलेल्या मुलांपैकी 40 टक्के मुली होत्या. त्यांचे वय 14 ते 18 वर्षांदरम्यान होतं. तर छेडछाडीला बळी पडलेल्या या वयातील मुलांची संख्या 33 टक्के होती. ग्रामीण भागात अधिक संख्या ऑनलाइन बाल लैंगिक शोषण आणि गैरव्यवहारांना (OCSEA) शहरी मुलांपेक्षा ग्रामीण मुलं अधिक बळी पडल्याचं समोर आलंय. चाइल्ड राइट्स अँड यू (CRY) आणि पाटणाच्या चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (CNLU) यांनी संयुक्तपणे हे सर्वेक्षण केलं होतं. सर्वेक्षणात, पालकांना विचारण्यात आलं क त्यांच्या मुलाचा ऑनलाइन लैंगिक छळ झाला तर ते काय करतील. त्यावर फक्त 30 टक्के पालकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करणार असल्याचं सांगितलं. तर 70 टक्के पालकांनी पोलीस ठाण्यात जाण्यास नकार दिला. धुळे हादरलं! खेळताना दहा वर्षाच्या मुलाने विजेच्या खांबाला धरलं अन् क्षणभरात गेला जीव, VIDEO या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पालकांपैकी केवळ 16 टक्के पालकांनाच लहान मुलांसोबत होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या बाबतीत काय कायदेशीर मदत घेता येते, याची माहिती होती. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या मुलांमध्ये दोन संकेत सर्वांत जास्त दिसून आले. अशी मुलं (26 टक्के) कोणत्याही कारणाशिवाय शाळेत सतत गैरहजर राहतात. काही प्रकरणांमध्ये, असं आढळून आलं की पीडित मुलं (20.9 टक्के) शाळेत स्मार्टफोनचा अधिक वापर करू लागली होती. भारतात लहान मुलांच्या तस्करीसाठीही इंटरनेटचा वापर होत असल्याचं संशोधनात समोर आलंय. गुन्हेगार यासाठी लहान मुलांना लक्ष्य करतात. CRY च्या डेव्हलपमेंट सपोर्ट डायरेक्टर सोहा मोईत्रा यांनी या घटना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदींचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज व्यक्त केली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात