मुरादाबाद**, 9 ऑक्टोबर** : देशात आजही अनेक ठिकाणी अंधविश्वासाच्या घटना वारंवार समोर येत आहेत. इतकच नाही तर ढोंगी लोकांना जिवंत करण्याचाही दावा केला जातो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून समोर आली आहे. येथे सापाच्या दंशामुळे एका मुलाचा मृत्यू झाला. मात्र पुन्हा जिवंत करण्याचा दावा करून गारूड्याने तीन दिवसांपर्यंत मुलाचा मृतदेह स्वत:जवळ ठेवला. जावेदचं मटणाचं दुकान आहे. त्याचा 10 वर्षीय मुलगा मोहम्मद शादला सोमवारी रात्री विषारी सापाने दंश केला होता. मंगळवारी सकाळपर्यंत मुलाची प्रकृती ढासळली. त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू होते. येथे मुलाचा मृत्यू झाला. साधा साप समजून मुलाने खतरनाक King Cobra चीच शेपटी धरली; पुढच्याच क्षणी… Shocking Video गारूड्याने केला होता मुलाला जिवंत करण्याचा दावा… याबाबत परिसरातील काही गारुड्यांना माहिती झाली. गारूड्याने मुलाच्या कुटुंबाकडे दावा केला की, शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत मुलगा पुन्हा जिवंत होईल. यानंतर काही दिवस त्याने मुलाचा मृतदेह स्वत:जवळच ठेवला. शनिवारी सकाळी गावचे माजी सरपंच मुलाच्या घरी पोहोचले. त्यामुळे मुलावर डॉक्टरांकरवी उपचार करण्याचा सल्ला दिला. मात्र तोपर्यंत मुलाचा मृत्यू होऊन दिवस लोटले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.