प्रयागराज, 3 नोव्हेंबर: एखादी तरुणी डेटिंग (Chatting on dating website does not decide character says high court) वेबसाईटवर असण्याचा तिच्या चारित्र्याशी काहीही संबंध असू शकत नाही, असं न्यायालयानं आरोपीच्या वकिलांना सुनावलं आहे. एका तरुणीनं दाखल केलेल्या (Cheating and rape case) फसवणूक आणि बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयानं हे मत नोंदवलं आहे. चारित्र्याच्या आधारावर तरुणीला दोषी ठरवू पाहणाऱ्या (Court rejects bail application) आरोपीचा जामीनही न्यायालयानं फेटाळला आहे.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये एका तरुणीची डेटिंग साईटवर एका तरुणासोबत ओळख झाली. लवकरच त्यांनी एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला. तीन दिवसांत ते प्रत्यक्ष एकमेकांना भेटले. तरुणीनं केलेल्या दाव्यानुसार, तरुणाने पहिल्या भेटीतच लग्नाचं आश्वासन दिलं. त्यानंतर त्यांनी एकमेकांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र त्यानंतर तरुणानं लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणीनं त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
आरोपीकडून तरुणीच्या चारित्र्यावर संशय
डेटिंग वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी जर तरुणी तरुणासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत असेल, तर तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला जागा असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला. हा दावा न्यायाधीशांनी फेटाळून लावत एखादी तरुणी केवळ डेटिंग साईटवर ऑनलाईन असणे, हा चारित्र्य ठरवण्याचा निकष असू शकत नाही, असं आरोपीच्या वकिलांना सुनावलं.
हे वाचा- भारतात कोळशाचा वापर पूर्ण थांबेल? जाणून घ्या काय असेल भविष्यातील स्थिती
परस्पर सहमती की फसवणूक?
आरोपीच्या वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार तरुण आणि तरुणी यांच्यात परस्पर सहमतीने शारीरिक संबंध आले असून लग्नाचं कुठलंही आश्वासन तरुणानं दिलं नव्हतं, असं म्हटलं आहे. तर तरुणीनं मात्र लग्नाचं आश्वासन दिल्यामुळेच आपण शारीरिक संबंधाना सहमती दाखवली होती, असा दावा केला आहे. या प्रकरणात तरुणीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या आरोपीच्या जामीनाचा अर्ज अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तरुण बलात्काराप्रकरणी दोषी आहे की नाही, या फैसला होईलच, मात्र तरुणीच्या चारित्र्यावर घेतलेला संशय निराधार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, High Court, Rape