मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! जिथे चोरी करायला गेला तिथेच मिळाली मृत्यूची शिक्षा

धक्कादायक! जिथे चोरी करायला गेला तिथेच मिळाली मृत्यूची शिक्षा

कोळशाची चोरी जीवावर बेतली, ट्रकखाली येऊन तरुणाचा मृत्यू

कोळशाची चोरी जीवावर बेतली, ट्रकखाली येऊन तरुणाचा मृत्यू

कोळशाची चोरी जीवावर बेतली, ट्रकखाली येऊन तरुणाचा मृत्यू

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Kranti Kanetkar

चंद्रपूर : ज्या ठिकाणी चोरी करायला गेला तिथेच त्याला त्याच्या कर्माची फळ मिळाली. चोरी करणं एकाच्या जीवावर बेतलं आहे. कोळशाची चोरी करायला आलेल्या व्यक्तीला चांगलंच महागात पडलं. ही धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नांदगाव लालपेठ इथल्या खुल्या कोळशाच्या खाणीत घडली आहे.

चंद्रपूर जवळ असलेल्या या खुल्या कोळशाच्या खाणीतून कोळसा ट्रकमध्ये भरला जातो. त्यानंतर हे ट्रक तिथून बाहेर पडतात. खाणीतून ट्रक बाहेर जात असताना तिथे काही चोर या कोळशावर डल्ला मारण्यासाठी टपलेले असतात. असाच एक चोरी करत असताना ही चोरी त्याच्या जीवावर बेतली आहे.

संतापजनक! ग्राहकाने पिझ्झा-बर्गर घेतलं अन् बदल्यात डिलिव्हरी बॉयला घातली गोळी!

कोळसा खाणीतून गुरुवारी संध्याकाळी कोळसा भरून ट्रक बाहेर निघाला. त्यावेळी ठरल्या प्रमाणे चोर तिथे आले. कोळसा चोरण्यासाठी २० ते २५ वर्षांचा तरुणही ट्रकवर कोळसा चोरण्यासाठी चढला. यावेळी त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला.

चोर तरुणाच्या अंगावरून ट्रकचं चाक गेल्यानं त्याचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार अजून कुठेही नोंदवण्यात आली नाही. तर दुसरीकडे अशा गैरपद्धतीनं कोळशाची चोरी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. मात्र यावरही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

First published:

Tags: Chandrapur, Crime news