Home /News /crime /

VIDEO : पत्नीचं रौद्र रुप; रागाच्या भरात बारमध्ये बसलेल्या पतीच्या मित्रांवर झाडल्या गोळ्या

VIDEO : पत्नीचं रौद्र रुप; रागाच्या भरात बारमध्ये बसलेल्या पतीच्या मित्रांवर झाडल्या गोळ्या

पती-पत्नीतला वाद वाढत गेला तर त्याचं रुपांतर गुन्ह्यात होतं. हेच या व्हिडिओमधून समोर येत आहे

    तियांगुआ, 24 फेब्रुवारी: पती-पत्नीमध्ये वाद होणं, ही समान्य बाब आहे. पण पती-पत्नीतला वाद वाढत गेला तर त्याचं रुपांतर गुन्ह्यात होतं. अशीच एक थरारक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये पती पत्नीच्या भांडणामुळे (Husband wife Conflict) एका वेगळ्याच युवतीचा जीव गेला आहे. बायकोसोबत भांडण झालं म्हणून नवरा आपल्या मित्रांसोबत बारमध्ये एका टेबलवर बसला होता. त्यावेळी पत्नीने टेबलच्या दिशेने गोळीबार (Firing) केला आहे. यामध्ये सोबत बसलेल्या एका युवतीचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, हे प्रकरण ब्राझीलच्या तियांगुआ येथील आहे. गुरुवारी एका दाम्पत्याच्या भांडणामुळे एक गंभीर गुन्हा घडला आहे. 31 वर्षीय डायेन राफेला डी सिल्वा रॉड्रिगेजचा पती आपल्या आपल्या काही मित्रांसोबत बारमध्ये बसला होता. यावेळी 26 वर्षीय जाएन बटिस्टा बारो देखील याच टेबलवर बसली होती. यावेळी रॉड्रिगेज अचानक बारमध्ये घुसली आणि तिने टेबलाच्या दिशेने गोळीबार केला. या हल्ल्यात गोळी थेट बारोच्या डोक्याला लागली. ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात एक 24 वर्षीय व्यक्ती देखील गंभीर जखमी झाला आहे, त्याच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं दिसतं आहे की, रोड्रिगेज एका वेगळ्या व्यक्तीसोबत दुचाकीवर बारजवळ पोहचली आहे. यावेळी तिच्या हातात एक बॅग होती. या बॅगमधून बंदुक काढून तिने थेट पतीच्या दिशेने गोळीबार केला आहे. या व्हिडिओत असंही दिसत आहे की, गोळीबारानंतर संबंधित महिलेचा पती तिच्याकडून बंदूक घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे ही वाचा-सिनेमात शोभेल अशी घटना; 22 वर्षांपूर्वीच्या गँगरेपचा आरोपी अखेर अटकेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर काही वेळातच पोलिसांनी आरोपी रॉड्रिगेजला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आपल्या पतीवरील संतापामुळे तिने गोळी चालवली आहे. पती बारमध्ये जाण्यापूर्वी या दोघांमध्ये वाद झाला होता. अटकेनंतर गोळीबार करणार्‍या महिलेनं पोलिसांना सांगितलं की, तिने पतीच्या टेबलच्या दिशेने गोळी झाडली होती. तसेच मृत युवतीला आपण ओळखत नाही, असंही तिने सांगितलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Girl death, Gun firing

    पुढील बातम्या