राहुल कौशिक (भिलवाडा), 29 एप्रिल : राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भिलवाडा येथे किरकोळ कारणावरून आपल्याच आईची निर्घृण हत्या केली. आईला मारताना मुलाने तिच्या शरिरावर तब्बल 83 वार केल्याची माहिती समोर आली आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्या मुलाला अटक केली आहे. ही महिला पुर शहरातील विश्नोई परिसरात राहायची. शंकरलाल विश्वई यांच्या पत्नी मंजू (55) असे तिचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजूला तिच्या भावाच्या लग्नासाठी माहेरी जायचे होते. मुलगा सुनील (19) याने तीला माहेरी जाण्यापासून रोखले. यानंतरही मंजूने भावाच्या घरी जाण्याचा निर्धार केला. मंजूचा मुलगा सुनील याला राग आल्याने तो आईशी जोरजोरात भांडू लागला. त्याला राग अनावर झाल्याने चाकू घेऊन थेट आईवर 83 वार केले. यावेळी आई मंजूचा जागीच मृत्यू झाला.
धक्कादायक! पुण्यात सहावीतली विद्यार्थीनी गरोदर, पोटात दुखतंय म्हणून गेली होती दवाखान्यातघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी मुलगा सुनील याला अवघ्या काही तासात अटक केली. याप्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
ही घटना पुर शहरातील विश्नोई परिसरात घडली. मंजू (55) असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून, मंजूचा मुलगा सुनील याला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेच्या वेळी मंजूचा पती शंकरलाल विश्नोई बाजारात गेला होता आणि तिची सासू घराबाहेर बसली होती. मंजूचा भाऊ विनोद विश्नोई याने सुनीलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रागाच्या भरात आरोपीने आपल्याच आईवर 83 वेळा हल्ला केला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.