जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / तब्बल 8 महिने दीराकडून भावजयीचं लैंगिक शोषण; त्यानंतर भावाकडे केली धक्कादायक मागणी

तब्बल 8 महिने दीराकडून भावजयीचं लैंगिक शोषण; त्यानंतर भावाकडे केली धक्कादायक मागणी

तब्बल 8 महिने दीराकडून भावजयीचं लैंगिक शोषण; त्यानंतर भावाकडे केली धक्कादायक मागणी

आरोपी दीराने आपल्या भावजयीवर गेल्या 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार (rape) केले आहेत. त्यानंतर नराधम दीराने आपल्या मोठ्या भावाकडे धक्कादायक मागणी केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 31 जानेवारी: दीर- भावजयच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी एक घटना समोर आली आहे. आरोपी दीराने आपल्या भावजयीवर गेल्या 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केले आहेत. नराधम दीर एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने भावजयीशी लग्न करण्याची इच्छा असल्याचं आपल्या भावाला सांगितलं. तिच्याशी मला लग्न करायचं आहे, त्यामुळे तू तिला सोडून दे, असं या आरोपी दीराने आपल्या भावाला म्हटलं, यावरून दोन्ही भावांत कडाक्याची भांडणं झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं. संबंधित घटना मध्यप्रदेशातील भोपाळ येथील आहे. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर, संबंधित महिलेनं धक्कादायक खुलासा केला आहे. गेल्या 8 महिन्यांपासून आरोपी दीराने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं तिने म्हटलं आहे. तसेच अत्याचारानंतर घटनेची वच्यता कुठेही केली तर बदनामी करण्याची धमकीही आरोपी दीराने दिली असल्याचं महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी आरोपी अभिषेकवर लैंगिक अत्याचार आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित महिला टीटी नगर परिसरात राहत असून त्यांचं मुळ गाव पन्ना आहे. टीटी नगर भागात पीडितेच्या पतीचं दुकान आहे. पीडिताने पोलिसांना सांगितलं की, लॉकडाऊनच्या काळात पीडित महिला आपला पती आणि मुलांसोबत पन्ना येथे मुळ गावी गेले होते. लॉकडाऊन असल्यामुळे पुढील काही महिने त्यांना तिथे गावातच राहावं लागलं. दरम्यान मोठ्या सासऱ्यांचा मुलगा अभिषेक यांने पीडितेला शेतात पकडलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. विरोध केल्यानंतर आरोपीने तिला बदनाम करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला आहे. पण ऑगस्टमध्ये लॉकडाऊन उठल्यानंतर पीडित महिला आपल्या पती आणि मुलांसोबत परत भोपाळला आली. पण बदनामीच्या भितीने तिने कोणाला काहीही सांगितलं नाही. हे ही वाचा- नसबंदीदरम्यान घडला धक्कादायक प्रकार; महिलेच्या नातेवाईकांनी घातला गोंधळ त्यानंतरही आरोपीने भोपळला येऊन पतीच्या अनुपस्थितीत पीडितेवर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले आहेत. प्रत्येक वेळी आरोपी दीराने तिला बदनामीची धमकी दिली. 24 जानेवारीलाही आरोपी अभिषेक पुन्हा भोपाळला आला होता. यावेळी पीडित महिला तिच्या पतीसोबत दुकानात काम करत होती. आरोपी दुकानात आला आणि त्याने पीडितेच्या पतीशी भाडणं केलं आणि म्हणाला मी तिला माझ्यासोबत ठेवणार आहे. त्यानंतर दोन्ही भावांची कडाक्याची भांडणं झाली. या भांडणानंतर आरोपी तेथून निघून गेला. पण पीडितेनं तिच्यासोबत घडलेल्या लैगिंक अत्याचाराची कहाणी तिच्या पतिला सांगितली. त्यानंतर रात्री उशीरा पोलीस ठाण्यात जावून पीडित दाम्पत्याने आरोपी दीराविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात