नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी: उर्मिला अहिरवार या 28 वर्षीय तरुणीमुळे राजस्थान (Rajasthan News), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आदी राज्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या तरुणीची एक गँग असून ते नातेवाईक होऊन हिचं लग्न ठरवतात. आणि संधी साधत लुटारू नवरी घर साफ करून पळ (gold robbery) काढते. या तरुणीने गेल्या दोन वर्षांत सात लग्न केली आहेत. कसं सुरू झालं हे प्रकरण? उर्मिला अहिरवार हिचं पहिलं लग्न 8 वर्षांपूर्वी जबलपूरमध्ये 20 वर्षीय अजय अहिरवारसोबत झालं. अचानक पतीच्या मृत्यूनंतर उर्मिला माहेर येऊन राहू लागली. तिचे आई-वडील मजुरी करीत होते. उर्मिला शिवणकाम करून घरखर्च देत होती. दरम्यान उर्मिलाची ङेट भागचंद कोरी नावाच्या तरुणासोबत झाली. दोघे प्रेमात पडलं. यानंतर दोघांनी आपल्या गँग हळूहळू वाढवली. ही टीम आजूबाजूच्या परिसरातील ज्यांची लग्न रखडली आहेत, अशांचा शोध घेत. याची सुरुवात जयपूरमधून 35 वर्षीय विजयपासून झाली. विजयचं बऱ्याच वर्षांपासून लग्न ठरत नव्हतं. गँगने या दोघांचं लग्न ठरवलं, लग्नाच्या चार महिन्यात उर्मिला संधी साधत कॅश आणि सोन्याचे दागिने घेऊन माहेरी आली. येथे तिने पतीवर अत्याचाराचा आरोप करीत घटस्फोटाची केस दाखल केली. हे ही वाचा- हैवान पती..! आधी कुकरनं वार, नंतर Cylinder घातला डोक्यात; पत्नीची क्रूर हत्या दुसरं लग्न सागरमध्ये झालं. येथे ती 15 दिवस राहिली. मग दागिने आदी घेऊन माहेरी निघून आली. यातही तिला बरेच पैसे मिळाले होते. तिसरा शिकार दमोहमध्ये 38 वर्षांचा तरुण. लग्नाच्या 15 दिवसांनंतर पुन्हा उर्मिला दागिने, पैसे घेऊन फरार झाली. लग्नाच्या ऐवजात तिला 17 हजार रुपये मिळाले. चौथं प्रकरण राजस्थानातील राजाखेडात. येथेही 15 दिवसांनंतर ती कॅश, दागिने घेऊन फरार झाली. पाचवं धौलपूर आणि सहावं जयपूर. 7 व्या प्रकरणात 2 फेब्रुवारी 2022 रोजी 41 वर्षीय दशरथ पटेलसोबत लग्न केलं. मंगळवारी कोर्टाजवळी मंदिरात लग्न केल्यानंतर कॅश आणि दागिने घेऊन ती फरार झाली. त्यावेळी तिच्या गँगमधील अर्चना बर्मन पकडली गेली आणि संपूर्ण गँगचा खुलासा झाला. आता लग्न नकोच.. दुसरीकडे लुटारू नवरीने धोका दिलेले दशरथ पटेल यांची सर्व स्वप्न तुटली आहेत. या पुढे लग्न करणार नसल्याचा निर्णय त्याने घेतला आहे.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.