मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

चौथा फेरा घेताच नवरी दागिने घेऊन फरार, प्रकार लक्षात येताच नवरदेवानं गाठलं पोलीस ठाणं

चौथा फेरा घेताच नवरी दागिने घेऊन फरार, प्रकार लक्षात येताच नवरदेवानं गाठलं पोलीस ठाणं

एका नवरदेवाची  (Groom) नवरीबाई (Bride) चार फेरे घेतल्यानंतर फरार झाली आहे. लग्नाच्या (Marriage) नावानं आपली फसवणूक (Fraud) झाल्याचं लक्षात येताच नवरदेवाला धक्काच बसला.

  • Published by:  Kiran Pharate

वाराणसी 12 एप्रिल : लग्न म्हटलं की नवरदेव (Groom) आणि नवरीसाठी (Bride) आनंदाचा दिवस, मात्र एका घटनेत लग्नादिवशीच नवरदेवाला मोठा धक्का बसला आहे. कारण, या नवरदेवाची नवरीबाई चार फेरे घेतल्यानंतर फरार झाली आहे. ती केवळ फरार झाली नाही, तर दागिने घेऊन पळाली आहे. लग्नाच्या (Marriage) नावानं आपली फसवणूक (Fraud) झाल्याचं लक्षात येताच नवरदेवाला धक्काच बसला. यानंतर या युवकानं परतापूर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार करत नवरीचा तपास करण्याची मागणी केली आहे.

मुजफ्फरनगरच्या मोहम्मदपूर गूमी येथील रहिवासी देवेंद्रनं सांगितलं, की त्याच्या ओळखीचा प्रदीप नावाचा व्यक्ती मोदीनगरमध्ये राहातो. प्रदीप हे स्थळं घेऊन आला आणि सांगितलं, की एक कुटुंब आपल्या मुलीच्या लग्नासाठी मुलगा शोधत आहे. या बदल्यात एक लाख रुपये द्यावे लागतील. या तरुणीचा फोटोही देवेंद्रला व्हॉट्सअॅपवर दिला गेला. देवेंद्रनं लग्नासाठी होकार दिला. रविवार परतापूरमध्ये लग्न करायचं ठरलं. देवेंद्र एक लाख रुपये आणि दागिने घेऊन रविवारी दुपारी परतापूरच्या भूडबराल गावात पोहोचला. इथे एका मंदिरात हे लग्न होणार होतं. दुपारी मोहिउद्दीनपुर बागेजवळ शिव मंदिरात लग्नाचे विधी सुरू झाले. मुलीच्याकडचे तीन आणि मुलाकडचे चार लोक लग्नाला उपस्थित होते.

चार फेरेच पूर्ण झाले असतानाच मुलीकडच्या लोकांनी ठरलेली रक्कम मागितली. रक्कम घेतल्यानंतर एक फेरा आणखी घेत नवरीनं बाथरुममध्ये जायचं असल्याचं सांगितलं. यानंतर नवरी गेली ती परत आलीच नाही. नवरीची मावशी असल्याचं सांगणारी आणखी महिला आणि आणखी एक व्यक्ती तिला शोधण्याच्या बहाण्यानं तिथून निघून गेले. याच दरम्यान लग्न लावणार पंडीतही गायब झाला. बराच वेळ कोणीच परत न आल्यानं देवेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात आलं, की आपल्यासोबत फसवणूक झाली आहे.

देवेंद्र आणि त्याच्यासोबतचे लोक यानंतर परतापूर पोलीस ठाण्यात पोहोचले आणि तक्रार दाखल केली. सोबतच नवरीचा फोटोही दिला. पोलीस या प्रकरणात दिल्या गेलेल्या मोबाईल नंबरच्या आधारे पुढील तपास करत आहेत. याप्रकरणी सध्या अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

First published:

Tags: Financial fraud, Marriage, Wedding