जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / लग्न झालेल्या गर्लफ्रेंडला भेटायला गेला, नवऱ्याला दोन्ही दिसले त्या अवस्थेत अन्..., अंगावर काटा आणणारी घटना

लग्न झालेल्या गर्लफ्रेंडला भेटायला गेला, नवऱ्याला दोन्ही दिसले त्या अवस्थेत अन्..., अंगावर काटा आणणारी घटना

मृत तरुण

मृत तरुण

लग्नानंतरही एका तरुणीचे आपल्या प्रियकराशी संबंध होते. मात्र, हे प्रियकराच्या चांगलेच अंगलट आले.

  • -MIN READ Local18 Jhansi,Uttar Pradesh
  • Last Updated :

अश्वनी कुमार, प्रतिनिधी झाशी, 7 जुलै : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधांतून हत्या, आत्महत्या, तसेच खूनाच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित प्रेयसीला भेटायला गेलेल्या एका प्रियकराची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - मिळालेल्या माहितीनुसार, गोलू असे 25 वर्षांच्या मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे गुमनावारा गावातील एका तरुणीसोबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण प्रेयसीचे लग्न झाल्यानंतरही गोलू आपल्या प्रेयसीला विसरू शकला नव्हता. त्यामुळे गोलू दर आठवड्याला ओराई येथे राहणाऱ्या तिच्या प्रेयसीला भेटायला जायचा. दरम्यान, 30 जूनच्या संध्याकाळी गोलू आपल्या पत्नीला काही महत्त्वाच्या कामासाठी कानपूरला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला. पण तो घरी परतला नाही.

News18लोकमत
News18लोकमत

2 दिवस गोलूचा शोध घेऊनही त्याचा काही सुगावा लागला नाही. यानंतर गोलूच्या नातेवाइकांनी सिपरी बाजार पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच काही अनुचित प्रकार घडला असावा, अशी भीतीही त्यांनी पोलिसांजवळ व्यक्त केली होती. पोलिसांनी गोलूच्या कुटुंबीयांची चौकशी केली असताना काही माहिती समोर आली. पोलिसांच्या चौकशीत मृत गोलूच्या नातेवाईकांनी सांगितले की, त्याचे गुमनावाडा येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. तसेच त्यांनी दोन जणांवर संशय व्यक्त केला. मृत गोलूच्या नातेवाईकांना माहिती मिळाली की, गोलू कानपूरला जाण्याऐवजी आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या सासरी ओराई येथे गेला होता. माहिती मिळताच मृत प्रियकराचे कुटुंबीय ओराई येथे पोहोचले, 31 जून रोजी ओराई येथील कानपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रेयसीच्या नातेवाईकांची गाडी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. पोलिसांना सापडलेल्या या महत्त्वाच्या सुगाव्यानंतर याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी आधी प्रेयसीच्या गुमनावाडा येथील घरावर छापा टाकला. पोलिसांनी प्रेयसीचे वडील आणि तिचा भाऊ मयंक यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता धक्कादायक खुलासा समोर आला. मृत तरुणाच्या प्रेयसीचा भाऊ आणि वडिलांनी पोलिसांना सांगितले की, 30 जूनच्या रात्री मृत गोलू हा आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या सासरच्या घरी गेला होता. तेव्हा जावई अवधेशने याने आपली पत्नी आणि तिचा प्रियकर गोलू या दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. यानंतर पती अवधेशने गोलूला ओलीस ठेवले आणि संपूर्ण प्रकरण पत्नीच्या पालकांना सांगितले. पत्नीचे वडील आणि भाऊ पत्नीच्या माहेरून कारमध्ये ओराई येथे आले आणि ओलीस ठेवलेल्या गोलूला प्रेयसीचा पती, वडील, भाऊ, मेहुणा यांनी रात्रभर बेदम मारहाण केली. यानंतर 1 जुलैच्या रात्री प्रियकर गोलूला मद्यधुंद अवस्थेत झाशीला आणले. पुन्हा झाशीला येताना पती अवधेश, सासरा, दाजी आणि मेहुणा यांनी मिळून गोलूच्या डोक्यात हातोड्याने वार करत त्याची हत्या केली. एसपी सिटी ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, पोलिसांच्या चौकशीत हा अतिशय खळबळजनक खुलासा झाल्यानंतर, पोलिस मारेकऱ्यांसह रिकाम्या प्लॉटवर पोहोचले, इथे मारेकऱ्यांनी मध्यरात्री मृत प्रियकर गोलूला दफन केले होते. यावेळी रिकाम्या प्लॉटमध्ये पुरलेल्या गोलूचा मृतदेह पोलिसांनी मारेकऱ्यांकडून बाहेर काढण्यात आला. जमिनीत पुरलेला प्रेमी गोलूचा मृतदेह बाहेर काढताच मृताच्या नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली. यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी खूनाचे आरोपी असलेला गोलूच्या प्रेयसीचा पती अवधेश, वडील, भाऊ मयंक, मेव्हणा दीपक आणि ड्रायव्हर शरद यांना अटक करून तुरुंगात पाठवले. त्याचवेळी दुसरा मारेकरी दीपकच्या शोधात पोलीस छापेमारी करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात