जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / जम्मूमध्ये श्रद्धा वालकरसारखे हत्याकांड, डॉक्टर सुमेधावर प्रियकर जौहरने केले सपासप वार, त्यानंतर...

जम्मूमध्ये श्रद्धा वालकरसारखे हत्याकांड, डॉक्टर सुमेधावर प्रियकर जौहरने केले सपासप वार, त्यानंतर...

देशाचं नंदनवन असलेल्या जम्मू काश्मिरमध्येही एका महिला डॉक्टराची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

देशाचं नंदनवन असलेल्या जम्मू काश्मिरमध्येही एका महिला डॉक्टराची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

आरोपीच्या नातेवाईकाने पोलिसांना माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आला.

  • -MIN READ Local18 Jammu and Kashmir
  • Last Updated :

जम्मू- काश्मीर, 10 मार्च : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे अवघा देश सुन्न झाला. त्यानंतर एकापाठोपाठ अनेक शहरांमधून अशाच घटना समोर आल्या. आता देशाचं नंदनवन असलेल्या जम्मू काश्मिरमध्येही एका महिला डॉक्टराची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हत्येनंतर आरोपीने स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला. तो जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलब टिल्लो (जम्मू) येथील कमल किशोर शर्मा यांची मुलगी डॉ. सुमेधा शर्मा असं या महिला डॉक्टरचे नाव आहे. तर तिचा आरोपचं प्रियकर जौहर गनई असं नाव आहे. आरोपीचे कुटुंब सध्या पंपोश कॉलनीत राहते.आरोपीच्या नातेवाईकाने पोलिसांना माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. आरोपी जोहर गनई याने वैयक्तिक कारणांमुळे आपण जीवन संपवणार असल्याची पोस्ट फेसबुकवर लिहिल्याचे पोलिसांना सांगण्यात आलं. माहिती मिळताच पोलीस जम्मूतील जानीपूर येथील जोहरच्या घरी गेले. घराचे गेट बाहेरून बंद होते. पोलिसांनी घरात प्रवेश केला असता महिला डॉक्टर सुमेधा यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला, तर आरोपीच्या पोटात गंभीर जखमेच्या खुणा होत्या. पोलिसांनी दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना तपास करून मृत महिला डॉक्टरचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. आरोपीची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दोघेही होते एकाच कॉलेजमध्ये मृत सुमेधा शर्मा आणि आरोपी जोहर हे दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. आधी मैत्री आणि त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते. दोघांनी जम्मूमधील डेंटल कॉलेजमधून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (बीडीएस) केली. आता सुमेधा शर्मा जम्मू-काश्मीरच्या बाहेरील कॉलेजमधून एमडीएस करत होत्या. जोहर आणि सुमेधा यांनी डेंटल कॉलेजमधून बीडीएस केले. त्या दिवशी काय घडलं? सुमेधा होळीच्या सुट्टीत जम्मूमध्ये होती आणि 7 मार्च रोजी ती जानीपूर येथे तिचा प्रियकर जोहरच्या घरी गेली होती, जिथे त्यांच्यात कुठल्या तरी कारणावरून भांडण झाले होते, त्यादरम्यान जोहरने किचनमधून चाकू आणला आणि सुमेधावर सपासप वार केले. सुमेधाची हत्या केल्यानंतर काही वेळाने तो भानावर आला. आणि आपल्या हातातून झालेल्या कृत्यामुळे आक्रोश करू लागला. त्यातूनच त्याने रागाच्या भरात चाकूने स्वत: वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला, असं वृत्त आज तक वृत्तवाहिनीने दिलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात