Home /News /national /

बॉयफ्रेंडसोबत फिरताना घरी येण्यास झाला उशिर, आईला दिलं सामूहिक बलात्कार झाल्याचं कारण!

बॉयफ्रेंडसोबत फिरताना घरी येण्यास झाला उशिर, आईला दिलं सामूहिक बलात्कार झाल्याचं कारण!

खरंतर, 16 वर्षाच्या एका मुलीने आपल्या आईशी घरातून पैसे चोरल्याबद्दल भांडण केले आणि घर सोडून निघून गेली. ती कित्येक तास घरी परतली नाही.

    हैदराबाद, 27 जानेवारी : हैदराबादच्या संगारेड्डी येथे एका 16 वर्षाच्या मुलीने असं काही खोटे बोलले की सगळ्यांना धक्का बसला आहे. तिच्या या खोटे बोलण्यामुळे अवघे पोलीस विभाग त्रस्त आहे. अनेक दिवसांपासून सगळे या प्रकरणात शोध घेत होते. परंतु जेव्हा सत्य समोर आले तेव्हा मुलीच्या घरच्यांपासून सगळ्यांनाच घाम फुटला. खरंतर, 16 वर्षाच्या एका मुलीने आपल्या आईशी घरातून पैसे चोरल्याबद्दल भांडण केले आणि घर सोडून निघून गेली. ती कित्येक तास घरी परतली नाही. घरातील माणसं बराच काळ तिचा शोध घेत राहिले. परंतु मुलीचा कोणताही शोध लागला नाही. त्यानंतर ही मुलगी रात्री उशिरा घरी पोहोचली तेव्हा तिने सांगितले की हैदराबादच्या अमीनपूर येथे चार लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. वृत्तानुसार, या घटनेने दुखावलेल्या पालकांनी मुलीला संगारेड्डी पोलीस ठाण्यात नेले. मुलीने इथल्या पोलिसांना सांगितले की, मी रागाच्या भरात घराबाहेर पडले होते. रस्त्यावर एकटे जात असताना अचानक एका दुचाकीस्वाराने माझ्यामागे येण्यास सुरुवात केली. मी दुचाकीस्वारला चपराक दिली तेव्हा तो तेथून निघून गेला. मग थोड्या वेळाने दुचाकीस्वार परत आला. मुलीने कथेत पोलिसांना सांगितले की, दुचाकीस्वाराने मुलीला धकमी दिली की तिचा स्नान करतानाचा व्हिडिओ आमच्याकडे आहे. तू आमच्यासोबत आली नाही तर तुझा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करू. त्यामुळे मी त्यांच्यासोबत बाईकवर गेले. त्यानंतर आरोपी मला अमीनपूर येथे घेऊन गेले, तिथे चार लोकांनी झुडपात नेऊन माझ्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून कारवाई करण्यास सुरवात केली. संपूर्ण पोलीस विभागाने मुलीने सांगितलेल्या क्षेत्रांची तपासणी सुरू केली, परंतु त्यांना काहीच हाती लागलं नाही. यादरम्यान, जेव्हा मुलीवर वैद्यकीय उपचार केले गेले तेव्हा गॅंगरेपची पुष्टी झालीच नाही. संगरेड्डीचे एसपी चंद्र शेखर रेड्डी यांनी माध्यमांना सांगितले की, पोलिसांनी मुलीच्या बोलण्यावर संशय व्यक्त केला. जेव्हा तिला बोलावले गेले आणि काटेकोरपणे चौकशी केली गेली तेव्हा तिने सांगितले की ती आपल्या प्रियकरासोबत बाहेर फिरण्यासाठी गेली होती. घरी आई ओरडेल म्हणून तिने सामूहिक बलात्काराची खोटी कहाणी सांगितली. ही बाब उघडकीस आल्यानंतर मुलीने पोलिसांकडे माफी मागितली. यावर पोलिसांनी मुलीला समजावलं आणि तिला सोडून दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या