जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 15 दिवसांपासून जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुण-तरुणी; गावात खळबळ

15 दिवसांपासून जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुण-तरुणी; गावात खळबळ

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

तब्बल 15 दिवसांपासून हा मृतदेह जंगलात लटकलेल्या अवस्थेत असल्याचं सांगितलं जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

Betul Crime News: बैतूल, 5 एप्रिल : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) बैतूल येथून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. येथील ललिया डोंगराळ भागातील जंगलात एका झाडावर ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुण-तरुणी सापडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सूचना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलात तपास केल्यानंतर झाडावर एका ओढणीला लटकलेला मृतदेह दिसला. हे मृतदेह तब्बल 15 दिवसांपासून येथे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृत तरुणाच्या पर्समध्ये आढळलेल्या ओळखपत्रावरुन त्याचा शोध घेण्यात आला. मृत तरुण बैतूलमध्ये राहून शिक्षण घेत होता. त्यात मुलगीदेखील बैतूल येथील आहे. बऱ्याच दिवसांपासून मृतदेह येथे लटकत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. हे ही वाचा- नात्याला काळीमा फासणारी घटना; आईने मुलाला दिली सख्ख्या बापाच्या हत्येची सुपारी त्यात उष्णता जास्त असल्या कारणाने मृतदेह खूप कुजले होते आणि सापळ्यासारखे दिसत होते. मृतदेहाच्या डोक्यावरील केसही जळाले होते. अद्याप त्यांच्या मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मृतदेह 15 ते 20 दिवसांपासून येथे असल्याचं प्राथमिक दर्शनी दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात