मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

CRPF कॅम्पमध्ये पत्नीवरील चर्चेमुळे खुनी संघर्ष; सब इन्स्पेक्टरवर गोळी झाडून हेड कॉन्स्टेबलने स्वत:वर झाडली गोळी

CRPF कॅम्पमध्ये पत्नीवरील चर्चेमुळे खुनी संघर्ष; सब इन्स्पेक्टरवर गोळी झाडून हेड कॉन्स्टेबलने स्वत:वर झाडली गोळी

या प्रकरणातनंतर कॅम्पमध्ये खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातनंतर कॅम्पमध्ये खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातनंतर कॅम्पमध्ये खळबळ उडाली आहे.

    सुकमा, 26 डिसेंबर : छत्तीसगडमधील (Chhattisgarh News) सुकमा जिल्ह्यातील कोंटाजवळील तेलंगणा राज्याच्या सीमा सीआरपीएफ (CRPF Camp) कॅम्पमध्ये वादानंतर सहकारी जवानाने एसएसआयला एके 47 ने चार राउंड फायर केलं. गोळी लागल्यामुळे एसएसआय उमेश चंद यांचा जागेवरच मृत्यू झाला. यानंतर जवानाने स्वत:च्या रायफलने आत्महत्या (Attempt to Suicide) करण्याचा प्रयत्न केला. सध्या जवानाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. (Bloody clashes at CRPF camp Sub inspector shot dead head constable shot himself) सीआरपीएफच्या 39 बटालियन तेलंगणा जिल्ह्याच्या मुलुंग येथील वेंकटपूरम कॅम्पमधील आहे. रविवारी सकाळी हेड कॉन्स्टेबल एम स्टिफनने सब इन्स्पेक्टरवर गोळी झाडली. सब इन्स्पेक्टर गोळी झाडल्यानंतर हेड कॉन्स्टेबल स्टीफनने स्वत:वर गोळी झाडली. कॅम्पमध्ये सब इन्स्पेक्टर आणि हेड कॉन्स्टेबलमधील वाद सोडवण्यासाठी जवानांनी बरेच प्रयत्न केले. मात्र रागात हेड कॉन्स्टेबलने सब इन्स्पेत्टरवर गोळी झाडल्यानंतर त्याच रायफलने स्वत:वर गोळी झाडली. गंभीर अवस्थेत साथी जवानांनी हेड कॉन्स्टेबलला सरकारी रुग्णालयात नेलं. येथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार दिल्यानंतर पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात रेफर केलं. सीआरपीएफ जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, हेड कॉन्स्टेबलच्या पत्नीवरुन सब इन्स्पेक्टर नेहमी मजा-मस्करी करीत, कमेंट करीत होता. हेड कॉन्स्टेबल स्टीफनने अनेकदा याचा विरोध केला होता. या रागातून त्यांनी सब इन्स्पेक्टरवर गोळी झाडल्याचं सांगितलं जात आहे. हे ही वाचा-महिलेने घरातील सर्व दारू संपवली; पतीचा संताप, दुसऱ्या दिवशी दारात आढळला मृतदेह काही महिन्यांपूर्वी नारायणपूर जिल्ह्यातदेखील वादानंतर एसटीएफ जवानाने सोबतीच्या जवानावर गोळी चालवली होती. यात तब्बल सात जवानांचा मृत्यू झाला होता. नक्षल भागात तैनात जवान आधीच तणावात होते, यानंतर अधिकारीच्या चुकीची वागणुकीमुळे त्यांना राग आला आणि कॅम्पमध्ये त्यांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्या.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Chattisgarh, CRPF, Suicide attempt

    पुढील बातम्या