चंदीगड 15 मार्च : हरियाणाच्या फरीबाद जिल्ह्यामध्ये स्वतःला भाजप नेता (BJP Leader) सांगणाऱ्या एका व्यक्तीवर महिलेला मारहाण आणि तिच्या मुलीसोबत छेडछाड केल्याचा आरोप (Allegation) लावला गेला आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात पॉक्सो कायद्याच्या कलम 8 आणि आयपीसी कलम 323 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीचा हा व्हिडीओ सध्या फरीदाबादमध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये महिलेला मारहाण करताना दिसणारा हा व्यक्ती अशोक गोयल आहे. हा व्यक्ती स्वतःला भाजप नेता असल्याचं सांगतो. त्याच्यावर जे आरोप लागले आहेत, ते आपण व्हिडीओमध्ये ऐकू शकता. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचे एका महिलेसोबत अवैध संबंध आहेत. इतकंच नाही, तर तिच्या मुलीवरही या व्यक्तीची वाईट नजर आहे. जेव्हा या महिलेनं या गोष्टीचा विरोध केला तेव्हा त्यानं महिलेला मारहाण केली. याशिवाय आपल्या अनेक मोठ्या नेत्यांसोबत संबंध असल्याचं सांगत फरीदाबादमध्ये कोणीही त्याचं काही वाकडं करू शकत नाही, असंही त्यानं म्हटलं. महिलेच्या तक्रारीनंतर आता या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेनं केले हे आरोप - पीडितेनं सांगितलं, की ती आरोपी अशोक गोयलच्याकडे काम करते. हा आरोपी मागील सहा महिन्यांपासून महिला आणि तिच्या मुलीसोबत छेडछाड करायचा. याच कारणामुळे महिलेच्या मुलीनं ब्लेडनं आपली नस काटत आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. पीडितेनं सांगितलं, की आरोपी अशोक तिला इतर लोकांसोबतही संबंध ठेवण्यास सांगायचा. महिलेच्या मुलीनं सांगितलं, की आरोपी तिच्यासोबत छेडछाड करायचा आणि नकार दिल्यास लाकडानं तसंच काठ्यांनी मारहाण करायचा. आरोपी तिला अशी धमकी द्यायचा की त्याची मोठमोठ्या नेत्यांसोबत ओळख आहे. फरीदाबादमध्ये कोणीच त्याचं काहीही वाकडं करू शकत नाही.